वीज कामगारांचा शनिवारपासून संप; बोनस, पगारवाढीचा दुसरा हप्ता देण्याची मागणी 

निलेश छाजेड
Friday, 13 November 2020

महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनीत कार्यरत ८६ हजार कामगार, अभियंते व अधिकारी यांचे नेतृत्व करणाऱ्या सघंटनांची गुरुवारी ऑनलाइन बैठक झाली. त्यात ऊर्जासचिव असिम गुप्ता, तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी चर्चा झाली.

नाशिक रोड / एकलहरे : बोनस, सानुग्रह अनुदान व पगारवाढीचा दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी मिळावा, या मागणीसाठी वीज कामगार येत्या शनिवार (ता. १४)पासून संपावर जाणार आहेत. यासंदर्भात वीज कंपनीतील कामगार, अभियंते, अधिकारी, सहाय्यक संघटना कृती समीतीतर्फे नाशिक रोड येथील वीज भवनासमोर गुरुवारी द्वारसभा झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार येत्या शनिवारी सकाळी आठपासून हा संप करण्यात येणार आहे. 

वीज कामगारांचा शनिवारपासून संप 
महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील महानिर्मिती, महापारेषण व महावितरण कंपनीत कार्यरत ८६ हजार कामगार, अभियंते व अधिकारी यांचे नेतृत्व करणाऱ्या सघंटनांची गुरुवारी ऑनलाइन बैठक झाली. त्यात ऊर्जासचिव असिम गुप्ता, तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी चर्चा झाली. मात्र, त्यांनी बोनस व सानुग्रह अनुदान देता येणार नसल्याची भूमिका घेतल्याने द्वारसभेत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वच संघटनांनी याबाबत पत्र देऊन मागणी केली आहे. तसेच, ऊर्जामंत्री, ऊर्जा सचिव, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनाही कंपनीतील २७ सघंटनांनी पत्र देत मागणी केली आहे. तरीही, सरकार व तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापन बोनस, सानुग्रह अनुदान देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

बोनस, सानुग्रह अनुदान व पगारवाढीचा दुसरा हप्ता देण्याची मागणी 

व्ही. डी. धनवटे, अरुण म्हसके, पंडित कुमावत, सतीश पाटील, हर्षद काटे, सुधीर गोरे, श्री. आहिरे, सुरेंद्रसिंग राजपूत, किसन लगड, मिलिंद दंडगव्हाळ, श्री. सातम, रघुनाथ ताजनपुरे, बाळासाहेब गोसावी, एस. आय. खान, भाऊसाहेब पाळदे, भास्कर लांडगे, योगेश पाटील, हर्षल कुमावत, अतुल आगळे, सुनील मालुंजकर, मधुकर जाधव आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, संपावर जाण्यापूर्वी गुरुवार (ता. १२)पासूनच राज्यभर द्वारसभा, निदर्शने करण्यात येत आहेत. तिन्ही वीज कंपन्यांतील कामगार, अभिंयते व अधिकाऱ्यांना संप व निदर्शने करण्याचे आवाहनही या वेळी करण्यात आले.  

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: power company workers strike from Saturday nashik marathi news