वीज प्रकल्पासाठी नाशिकचा पुन्हा विसर; सर्व सुविधा असूनही उरण वायू केंद्राचा विचार!

नीलेश छाजेड
Tuesday, 27 October 2020

सोमवार (ता.१२) रोजी कळवा - पडघा लाईन मध्ये बिघाड झाल्याने मुंबईची बत्ती गुल झाली होती. त्यावर पर्याय काढण्यासाठी उर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी उरण वायू केंद्र येथे एक हजार मेगा वॅट चा प्रकल्प घोषित केला .

एकलहरे (जि. नाशिक) : नुकतेच ग्रीड फेल होण्याने मुंबईवर जे संकट कोसळले होते, तसे भविष्यात होऊ नये याकरिता उरण येथे एक हजार मेगा वॅटचा वायू प्रकल्प घोषित करण्यात आला .मुळात नाशिकला सर्व सुविधा उपलब्ध असतांना पुन्हा एकदा नाशिकचा विचार न करता अन्याय करण्यात आल्याची भावना नाशिककरांमध्ये आहे.

सोमवार (ता.१२) रोजी कळवा - पडघा लाईन मध्ये बिघाड झाल्याने मुंबईची बत्ती गुल झाली होती. त्यावर पर्याय काढण्यासाठी उर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी उरण वायू केंद्र येथे एक हजार मेगा वॅट चा प्रकल्प घोषित केला . 

नाशिक उशाशी असतांना विचार का नाही

नाशिक औष्णिक वीज केंद्र येथे मुबलक जागा, रेल्वे, पाणी व राख साठवण बंधारा आदी सर्व सुविधा उपलब्ध असतांना व सर्वात महत्वाचे नाशिक ते मुंबई मधील रॅडियल डिस्टन्स अवघे शंभर ते सव्वाशे किलोमीटर असताना नाशिक ते पडघा लाईन महत्वाची ठरू शकते विजेची उपलब्धता / तुटवडा याचा विचार न करता उरण किती संयुक्तिक ठरू शकते हाही अभ्यासाचा विषय आहे. मुंबई मध्ये जागांचे भाव गगनाला भिडलेले असतांना नाशिकला सर्व सेट अप तयार असल्याने ६६०×२ किंवा २५०×२ चा विचार होणे आवश्यक आहे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

तज्ज्ञांना पडला प्रश्न

उरण प्रकल्पात आताही वीज निर्मिती वाढवता येऊ शकते पण केंद्र सरकार गॅस उपलब्ध करुन देत नाही तसेच मुंबई उपनगरांत होत असलेल्या प्रदूषणामुळे ह्या प्रकल्पाची निर्मिती क्षमता वाढविणे हे शक्य होणार नाही त्यामुळे ऊर्जामंत्र्यानी असे कसे जाहीर केले असा प्रश्न या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांना पडला आहे.

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

राज्यात इतरत्र वीज प्रकल्पांना विरोध होत असताना, नाशिक येथे दहा वर्षांपासून बदली संचासाठी पाठपुरावा सुरू असतांना उरण येथे प्रकल्पास मान्यता मिळते व नाशिकला डावलले जात आहे. - चंद्रशेखर आहेर (सचिव, प्रकल्प बचाव संघर्ष समिती)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: power project at uran energy got sanction by minister nitin raut nashik marathi news