नांगरे पाटलांच्या बदलीची चर्चा होताच नाशिकच्या 'नव्या' आयुक्तांच्या नियुक्तीचेही मेसेज व्हायरल; वाचा कोण आहेत ते?

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 21 August 2020

गुरुवार (दि 20) रोजी रात्री अचानक सोशल मीडियात नाशिकच्या नव्या पोलीस आयुक्तांचे फोटो व्हायरल झाले. सोबत नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून त्यांचे ऑनलाईन अभिनंदन देखील व्हायला सुरुवात झाली.आणि एकदमच चर्चेला उधाण आले. 

नाशिक : गुरुवार (दि 20) रोजी रात्री अचानक सोशल मीडियात नाशिकच्या नव्या पोलीस आयुक्तांचे फोटो व्हायरल झाले. सोबत नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून त्यांचे ऑनलाईन अभिनंदन देखील व्हायला सुरुवात झाली.आणि एकदमच चर्चेला उधाण आले. 

जिल्ह्याचे भूमिपुत्र दिघावकर यांची नियुक्ती?

नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाल्याची तसेच बागलाणचे भूमिपुत्र प्रताप दिघावकर यांची नाशिकच्या नव्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्याची चर्चा नाशिकमध्ये सोशल मीडियात सुरू आहे.याबाबत प्रशासनाकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. प्रताप दिघावकर हे नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. २२ व्या वर्षी एसीपी झालेल्या दिघावकारांनी २००० साली आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. शेतात राबणाऱ्या वडिलांच्या सोबत काम करून रात्रीच्या वेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या दिघावकर यांच्याप्रती नाशिककरांना आदर आहे. भूमिपुत्र नाशिक शहराच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेणार असल्याच्या सोशल मीडियावरील बातमीने सर्वांच्याच भुवया मात्र उंचावलेल्या दिसून येत आहेत.

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

 

 

 

Desktop Headline:

'या' धरणांतील पाणीसाठा वाढल्याने कसमादेतील पाणीपुरवठा योजनांना दिलासा...!

Desktop Body: 

नाशिक : (मालेगाव) कळवण तालुक्यावर रुसलेल्या पावसाचे गेल्या आठवड्यात दमदार आगमन झाल्याने चणकापूर व पुनंद धरणांतील साठा झपाट्याने वाढला. चणकापूर ७७, तर पुनंद ८७ टक्के भरले आहे. दोन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे मालेगावसह कसमादेतील लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूरपाण्यामुळे योजनांचे जलसाठे ओव्हरफ्लो झाले आहेत. 

चणकापूर ७७, तर पुनंद धरणात ८७ टक्के साठा  

कसमादेत समाधानकारक पाऊस होत असताना चणकापूर व पुनंद धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस नव्हता. सुरवातीचे दोन महिने पाऊस न झाल्याने धरणातील साठा कमी होता. मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात दमदार पावसाने साठ्यात वाढ झाली. चणकापूर धरणाचा साठा एक हजार ८६२ झाला असून, धरणातून ७०६ क्यूसेक पाणी गिरणा नदीत सोडले जात आहे. पुनंदमध्ये एक हजार १४३ दशलक्ष घनफूट साठा झाला असून, धरणातून एक हजार २५५ क्यूसेक पाणी गिरणा नदीत वाहत आहे. गिरणेच्या पूरपाण्यामुळे ठेंगोडा बंधाराही ओव्हरफ्लो झाला आहे. ठेंगोडा बंधाऱ्यातून दोन हजार १७ क्यूसेक पाणी गिरणा नदीपात्रात सोडले जात आहे.

दोन ते अडीच महिने पूरपाण्याचा फायदा

पूरपाण्यामुळे मालेगावसह कसमादेतील विविध पाणीपुरवठा योजनांचा साठा भरून घेण्यात आला आहे. मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे तलावात ८६ दशलक्ष घनफूट साठा असून, तलाव पूर्ण भरला आहे. दाभाडीसह बारागाव पाणीपुरवठा योजनेचा तलावही भरला आहे. गिरणेचे पूरपाणी आणखी महिनाभर चालल्यास नदीकाठच्या विहिरींना पाणी उतरण्यास मोठी मदत होणार आहे. पाणीपुरवठा योजनांना पुढील दोन ते अडीच महिने पूरपाण्याचा फायदा होऊ शकेल. 

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pratap Dighavakar can be new Commissioner of nashik marathi news