esakal | शुभेच्छा दिवाळीच्या, तयारी निवडणुकीची! इच्छुकांकडून आतापासूनच प्रचाराला सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

grampanchayt elections.jpg

कोरोनामुळे यंदा सर्वंच धर्मियांच्या सणावर मर्यादा आल्या आहेत. दिवाळीत सर्वाधिक गाजावाजा असतो. परंतु कोरोनामुळे दिवाळीवर मर्यादा आल्या. फटाके वाजविण्यास प्रशासनाने बंदी घातल्याने अनेकांना सुरसुऱ्या पेटवून दिवाळी साजरी करावी लागली. परंतु या सर्व दिवाळीच्या धामधूममध्ये पुढील वर्षाच्या निवडणुकांची तयारीची सलामी देण्यात आल्याचे दिसून आले.

शुभेच्छा दिवाळीच्या, तयारी निवडणुकीची! इच्छुकांकडून आतापासूनच प्रचाराला सुरवात

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनामुळे दिवाळी साजरी करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन दिवाळी साजरी केली. पुढील वर्षाच्या अखेरीपासून महापालिका निवडणुकीची तयारी सुरू होणार असल्याने इच्छुकांनी आतापासूनच प्रचाराला सुरवात केली आहे. 

इच्छुकांकडून आतापासूनच प्रचाराला सुरवात
कोरोनामुळे यंदा सर्वंच धर्मियांच्या सणावर मर्यादा आल्या आहेत. दिवाळीत सर्वाधिक गाजावाजा असतो. परंतु कोरोनामुळे दिवाळीवर मर्यादा आल्या. फटाके वाजविण्यास प्रशासनाने बंदी घातल्याने अनेकांना सुरसुऱ्या पेटवून दिवाळी साजरी करावी लागली. परंतु या सर्व दिवाळीच्या धामधूममध्ये पुढील वर्षाच्या निवडणुकांची तयारीची सलामी देण्यात आल्याचे दिसून आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोट्रेटद्वारे मतदारांना शुभेच्छा देण्यात आल्या.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

राजकीय फटाके वाजण्यास सुरवात

ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मतदारांसमोर इच्छुक प्रगट झाले. दिवाळीच्या निमित्ताने प्रचाराचा नारळ वाढविण्यात आल्याने पुढील वर्षाच्या सुरवातीपासूनच निवडणुकीला रंगत येणार असल्याचे दिसून येत आहे. २०२२ च्या मार्च महिन्यापर्यंत महापालिकेची मुदत असली तरी जानेवारी महिन्यात आचारसंहिता लागू होईल, त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याचा धडाका विद्यमान नगरसेवकांचा राहणार असून, याचाच अर्थ पुढील वर्षाच्या दिवाळीपासून राजकीय फटाके वाजण्यास सुरवात होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या तयारीचा भाग म्हणून अनेकांनी दिवाळी शुभेच्छांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे आगामी वर्ष हे निवडणूक प्रचाराचेच राहणार असल्याचे बोलले जात आहे.  

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान