मसाल्याचे पदार्थ खाताहेत भाव..! कोरोनापासून बचावासाठी काढा उत्तम पर्याय

garam masala.jpg
garam masala.jpg

नाशिक : कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत; पण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घरोघरी काढा बनविला जात आहे. या काढ्यासाठी लागणारी लवंग, काळी मिरी, दालचिनी अशा विविध मसाल्यांच्या पदार्थांची जोरदार खरेदी सुरू आहे. त्यामुळे या पदार्थांच्या मागणीत तिप्पट वाढ झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. तयार काढ्यांनाही मागणी वाढली आहे.

कोरोनापासून बचावासाठी आयुर्वेदिक काढा उत्तम पर्याय

कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला जात आहे. यासाठी नागरिक मसाल्याचे पदार्थ आणि त्याचबरोबर आयुष काढा घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. कोरोनापासून बचावासाठी आयुर्वेदिक काढा उत्तम पर्याय मानला जात आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडूनही यासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे. काढा करण्यासाठी लवंग, दालचिनी, काळी मिरी, ओवा, वेलची, सुंठ या पदार्थांचा वापर केला जातो. मागणी वाढली असली तरीही मुबलक पुरवठा होत असल्याने किमतीत फारसा फरक पडलेला नाही.

तयार काढ्याला संमिश्र प्रतिसाद
मालेगावचा युनानी काढा, सुरतचा हकीम नेचर लॅबचा काढा यांसह अन्य विविध नामांकित कंपन्या, संस्थांचे तयार काढे बाजारात उपलब्ध आहेत. मसाल्याच्या पदार्थांच्या तुलनेत तयार काढ्यांच्या किमती अधिक आहेत. यामुळे अशा प्रकारच्या काढ्यांना संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शंभर ग्रॅम तयार काढा १५० ते १७० रुपयांना मिळत आहे.

मागणी वाढली असली तरी किमती मात्र स्थिर
मसाल्याचे पदार्थ घेण्यासाठी ग्राहकांची संख्या वाढली आहे. दिवसाला दीडशेहून अधिक ग्राहक काढा बनविण्यासाठी मसाल्याचे पदार्थ खरेदी करत आहेत. मालेगावच्या युनानी काढ्यासाह अन्य तयार काढेही खरेदी केले जात आहेत.- प्रफुल्ल संचेती, व्यावसायिक

रोज दोनशेहून अधिक लोक काढा बनविण्यासाठी सामग्री घेत आहेत. याबरोबरच आयुष मंत्रालयच्या सूचनेनुसार आम्ही स्वतः घरी तयार केलेला काढा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. मागणी वाढली असली तरी किमती मात्र स्थिर आहेत.-जयंत चांदवडकर, विक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com