कोरोना संकटात बंदिवानांच्या लक्षवेधक कलाकृती; यंदा साकारल्या ५५० गणेशमूर्ती

prisoners creates ganpati idols in prison nashik marathi news
prisoners creates ganpati idols in prison nashik marathi news

नाशिक रोड : मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देऊन कामे दिली जातात. त्यासाठी कारागृहात सुतारकाम, लोहारकाम, विणकाम, रसायन, बेकरी, धोबीकाम, शिवणकाम, चर्मकला, मूर्तीकला असे नऊ विभाग आहेत. मूर्तिकाम विभागात कलेला प्रोत्साहन देऊन २०१७ पासून मूर्तिकाम सुरू केले आहे.

पर्यावरणपूरक मूर्ती

मध्यवर्ती कारागृहात कोविडच्या प्रादुर्भावामुळे मूर्तिकाम विभागातील काही बंदिवान पॅरोलवर गेले आहेत. त्यामुळे आहे त्या कारागिरांनी ५५० गणेशमूर्ती साकारल्या असून, त्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. २०१७ मध्ये प्रथमच १५० मूर्ती बनविल्या होत्या. बंदिवानांनी शाडूपासून आकर्षक, पर्यावरणपूरक मूर्ती बनविल्या होत्या. विक्री केंद्रात मूर्तींना प्रसिसाद मिळाला होता. २०१८ मध्ये एक हजार मूर्ती बनविल्या होत्या, तेव्हा १३ लाख उत्पन्न मि‍ळाले होते. २०१९ मध्ये आठशे मूर्ती बनविल्या होत्या. तेव्हा ११.३६ लाख इतके उत्पन्न मि‍ळाले होते. कागदाच्या लगद्यापासून १२ फुटांची पर्यावरणपूरक मूर्ती प्रथमच बनविली होती. 

५५० वेगवेगळ्या गणेशमूर्ती

या वर्षी कारागृह व सुधारसेवा पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनासाठी डिसेंबर २०१९ पासून गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू झाले. मार्च २०२० मध्ये कोविड-१९ चे मोठे संकट आले. त्याचा परिणाम कारागृहातील मूर्तिकाम विभागावर झाला. त्यामुळे घरगुती लहान अकाराच्या ५५० वेगवेगळ्या आकर्षक गणेशमूर्ती बनविण्यात आल्या. त्यामध्ये टिटवाळा, कमळ, पान आसन, आसन गणपती, गादी गणेश, दगडूशेठ हलवाई, लंबोदर, वक्रतुंड, गजमुख, सिंह फर्निचर, बालाजी, उंदीर रथ, राधाकृष्ण, शंकर-पार्वती आदी प्रकारच्या मूर्ती बवनिल्या आहेत. या सर्व मूर्ती शासनाच्या नियमावलीनुसार बनविल्या आहेत. 

मूर्तीसोबत पाट अन्‌ रुमाल 

कोविडमुळे कारागृहातील मूर्तिकाम विभागातील काही बंदी पॅरोलवर गेले आहेत. तरीही सध्या उपलब्ध कारागिरांनी गणेशमूर्ती बनविल्या. मूर्ती विक्री करताना ग्राहकांना सोबत पाट व रुमाल देण्यात येणार असून, घरीच विसर्जन करण्याच्या सूचना देण्यात येणार आहे.  

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com