धरण उशाला आणि कोरड घशाला!...धरणग्रस्त करताय 'हा' आरोप...

bham dam.jpg
bham dam.jpg

नाशिक : (काळूस्ते) येथे भाम नदीवर धरण झाले असले, तरी पुनर्वसन करण्यात आलेल्या धरणग्रस्तांची व्यथा मात्र कमी होत नाही. पुनर्वसन झाले असले तरी अजूनही त्यांना पुरेशा सोयी-सुविधा मिळत नाहीत. भाम धरण झाल्यानंतर भरवज, निरपन, बोरवाडी, सारुक्तेवाडी आदी गावांच्या विस्थापितांचे प्रशासनाकडून पुनर्वसन करण्यात आले. संबंधित धरणग्रस्तांना तुटपुंजी मदत करण्यात आल्याचा आरोप धरणग्रस्तां कडून करण्यात येत आहे. 

रोजगारासोबतच मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास गावाचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन

विस्थापितांसमोर रोजगाराचा काहीही मार्ग नसल्याने त्यांच्यासमोर विविध समस्या आ वासून उभ्या आहेत. प्रशासनाने याची दखल घेत त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. रोजगारासोबतच मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास गावाचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन होणार असल्याचे येथील विस्थापितांनी सांगितले. 
 
पाण्याची सुविधा नाही 

विस्थापितांसाठी या ठिकाणी शाळा, अंगणवाडी बांधण्यात आल्या आहेत. परंतु तेथे शौचालय, पाण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. पाणीपुरवठ्याची पाइपलाइन टाकली असली तरी पाणी अनियमित येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विस्थापितांकडून वेळोवेळी पुनर्वसन अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीचे ठराव देऊनसुद्धा परिस्थितीत बदल होत नसल्याने करावे तरी काय, असा प्रश्‍न ग्रामस्थांना पडला आहे. 

धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी आमची अवस्था झाली आहे. आमचे पुनर्वसन झाले; परंतु कोणत्याही प्रकारची सुविधा पुरविण्यात आलेली नाही. प्रशासनाने ग्रामस्थांशी चर्चा करून आमच्या समस्या सोडविण्याची मागणी आहे. - सीताबाई घारे, ग्रामपंचायत सदस्य, भरवज/निरपन 

पुनर्वसन झालेल्या जागेत घर बांधले; परंतु तेथे सोयी-सुविधा नाहीत. समाज मंदिर, बुद्धविहार, हातपंप, स्ट्रीट पोल, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. आम्हाला मिळालेला जमिनीचा मोबदला खूप कमी आहे. तो वाढवून मिळावा, अशी मागणी आहे. - नामदेव साळवे, ग्रामस्थ  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com