पंक्चर टायर दुरुस्तीतून साधली प्रगती! अंबासनच्या विलास सोनवणेंचा स्वकर्तृत्वावर आत्मनिर्भर प्रवास

ambasan garej.jpg
ambasan garej.jpg

अंबासन (जि.नाशिक) : पारंपरिक व्यवसायाला फाटा देत नाभिक समाजातील तरुणाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पंक्चर टायर दुरुस्तीतून ठसा उमटवत वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या व्यवसायातून वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करीत स्वकर्तृत्वावर आत्मनिर्भर होत केलेला जीवनप्रवास ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

अंबासनच्या विलास सोनवणेंकडून पारंपरिक व्यवसायाला फाटा 

अंबासन (ता. बागलाण) येथील विलास सोनवणे या तरुणाने आपल्या वडिलोपार्जित सलून व्यवसायाला बगल देत वेगळेच उडाण घेतले आहे. ग्रामीण भागात आजही सलून व्यवसायाला घरघर सुरू आहे. शहरी भागापेक्षा अगदी तोकड्या पैशांत कटिंग, दाढी होते. सोनवणे सांगतात, की पूर्वी लिंबाच्या झाडाखाली गोणपाट टाकून हजामत करावी लागत. या मोबदल्यात वर्षाकाठी धान्य मिळत होते. वाडी-वस्ती, शेतात जाऊन हजामत करावी लागत. त्यानंतर काळ बदलत गेला. नवनवीन सलून पार्लर सुरू झाले. गोणपाटची जागा आता आकर्षक खुर्चीने घेतली आहे. मात्र ग्रामीण भागात सलून व्यवसायात कुठलीही प्रगती साधता येत नव्हती. ॉ

सुरुवातीला अडचणी येत होत्या.
वडिलोपार्जित व्यवसाय सोडून काही वेगळे करता येईल का? अशा विचारात असताना नामपूर येथील दुचाकी दुरुस्तीच्या दुकानात काम केले. या व्यवसायाला जोडव्यवसाय म्हणून येथील टायर पंक्चर दुकानात लक्ष घातले. दोन वर्षे संपूर्ण काम अंगीकारले थोड्याफार पैशातून दुचाकीसाठी लागणारे साहित्य घेऊन व्यवसायाला श्रीगणेशा केला. सुरुवातीला अडचणी येत होत्या. मात्र जसजशी ग्राहकांची गर्दी होऊ लागली तसतसा उत्साह वाढू लागला. येणाऱ्या पैशातून फ्लॉट खरेदी करून तेथे दुकान थाटले. यात टायर पंक्चर आणि दुचाकी दुरुस्ती सुरू केली. याच व्यवसायामुळे घर बांधण्यासाठी मदत झाली तसेच घरासमोर चारचाकी वाहन उभे आहे. पारंपरिक व्यवसायात बदल केल्यानेच ते शक्य झाल्याचे विलास सोनवणे सांगतात. 

पूर्वी सलून दुकानातून फक्त कुटुंबीयाचा उदरनिर्वाह व्हायचा. मात्र आता घर बांधकामासह सर्व चैनीच्या वस्तू झाल्या आहेत. त्यात दोन्ही मुले शिक्षण घेत असून, घरात लक्ष्मी वावरत आहे. - मेघा सोनवणे, विलासची पत्नी, अंबासन 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com