esakal | संतापजनक! "एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय निसर्गच करेल".. अमानवी घटनेचा निषेध करणारी रांगोळी करतेय निशब्द..
sakal

बोलून बातमी शोधा

elephant-rangoli.jpg

या घटनेमुळे केवळ पर्यावरणप्रेमी, निसर्ग व वन्यजीवप्रेमी नव्हेच तर प्रत्येक संवेदनशील मन या घटनेने हळहळले. ज्या निसर्गाने केरळला भरभरून दिले, त्या राज्यातील एका गावात अशी घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. पर्यावरण दिनाच्या तोंडावर ही संतापजनक क्रूर घटना समोर आल्याने सर्वच क्षेत्रांमधून या घटनेचा अत्यंत तीव्र अशा शब्दांत निषेध नोंदविला गेला. 

संतापजनक! "एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय निसर्गच करेल".. अमानवी घटनेचा निषेध करणारी रांगोळी करतेय निशब्द..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  केरळमधील एका गर्भवती हत्तीणीचा खून या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने अवघा देश थरथरला. सोशल मिडियावर नेते, अभिनेत्यांपासून सर्वसामान्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत तीव्र शब्दांत संताप व्यक्त करण्यात येतोय. नाशिकमध्ये या क्रूर घटनेचा निषेध करत युवकांकडून आपल्या कलेद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.

माणुसकी मेली...निशब्द

केरळमधील एका गर्भवती हत्तीणीला काही क्रूर मानवांनी फटाक्यांनी भरलेला अननस खाऊ घातला. यानंतर तिला ज्या मरणयातना झाल्या. त्या मुक्या आईने एक दोन नव्हे तर चार दिवस पाण्याच्या तलावात उभे राहून भोगल्या अन् अखेर मृत्यूला कवटाळले. याच निंदनीय घटनेचा निषेध करणारी नाशिकची युवा रांगोळीकार पुजा बेलोकर व तिच्या सहकाऱ्यांनी सहा तास अविरत परिश्रम घेत ६ फूट रूंद व ८फूट लांबीची रांगोळी रेखाटून अमानवी कृत्याचा निषेध नोंदविला.

‘एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय जेव्हा निसर्ग करेल,

नाशिकमधील रविवार कारंजा येथील लोणार गल्लीत पुजा, ओमकार टिळे यांनी या क्रूर घटनेकडे आपल्या रांगोळीच्या कलेद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हत्तीणीचे चित्र रेखाटून ‘एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय जेव्हा निसर्ग करेल, तेव्हा तुमच्या गर्वाची, नीचपणाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही’ असा संतापजनक संदेशही रांगोळीद्वारे दिला आहे. ४८ चौरस फूटाची रांगोळी काढण्यासाठी पुजा आणि ओमकारला सुमारे सहा तासांचा वेळ लागला. या रांगोळीचे शीर्षक त्यांनी ‘अमानवी घटना’ असे दिले आहे. ही रांगोळी सध्या लक्ष वेधून घेत असून सर्वांनाच निशब्द करीत आहे.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "निसर्गा'ने केली आई-मुलाची ताटातूट...रात्रभर बछडा आईची वाट बघत होता

भारतीय वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी

या घटनेमुळे केवळ पर्यावरणप्रेमी, निसर्ग व वन्यजीवप्रेमी नव्हेच तर प्रत्येक संवेदनशील मन या घटनेने हळहळले. ज्या निसर्गाने केरळला भरभरून दिले, त्या राज्यातील एका गावात अशी घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. पर्यावरण दिनाच्या तोंडावर ही संतापजनक क्रूर घटना समोर आल्याने सर्वच क्षेत्रांमधून या घटनेचा अत्यंत तीव्र अशा शब्दांत निषेध नोंदविला गेला. 

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!