esakal | शिवजयंतीला दाखवलेली दहशतही संपली अन् माजही उतरला! पोलीसांनी चांगलीच काढली धिंड
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (72).jpg

कुणी कायदा हातात घेतला, तर त्याची गय केली जाणार नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी सांगितले. असे काय घडले कि शिवजयंतीच्या रात्री दाखवलेली दहशतही संपली आणि माजही उतरला...

शिवजयंतीला दाखवलेली दहशतही संपली अन् माजही उतरला! पोलीसांनी चांगलीच काढली धिंड

sakal_logo
By
वाल्मिक शिरसाट

देवळाली कॅम्प (जि.नाशिक) : कुणी कायदा हातात घेतला, तर त्याची गय केली जाणार नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख यांनी सांगितले. असे काय घडले कि शिवजयंतीच्या रात्री दाखवलेली दहशतही संपली आणि माजही उतरला...

शिवजयंतीला दाखवलेली दहशतही संपली अन् माजही उतरला! 

शिवजयंतीच्या रात्री चारणवाडीतील समाजकंटकांनी येथील त्रिमूर्ती चौकात झालेली गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यात दोन पोलिस गंभीर जखमी झाले. या घटनेची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सापडलेल्या सात संशयितांना अटक केली होती व उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असेही देशमुख यांनी सांगितले. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

पोलिसांनी शहरभर धिंड काढली

येथे काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती, याप्रकरणी अटकेत असलेल्या चारणवाडी परिसरातील सात संशयितांची सोमवारी (ता. २२) दुपारी एकला पोलिसांनी शहरभर धिंड काढली.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ