आधारभूत किमतीने खरीप धान्य खरेदीत वाढ; ६५ लाख शेतकऱ्यांना लाभ

maize sale.jpeg
maize sale.jpeg

नाशिक : केंद्र सरकारने किमान आधारभूत किमतीने खरिपातील धान्य खरेदीला सुरवात केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या योजनेचा फायदा आतापर्यंत देशातील ६५ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना झाला आहे. ९५ हजार ५९६ कोटी ८४ लाख रुपयांची धान्य खरेदी करण्यात आली आहे. 

६५ लाख शेतकऱ्यांना फायदा

खरिपातील तांदळाची खरेदी सुरू असून, वेगवेगळी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून तांदळाची आवक होत आहे. त्यामध्ये पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, उत्तराखंड, चंडीगड, जम्मू आणि काश्मीर, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये सोमवार (ता. ४)पर्यंत ५०६ लाख टनांपेक्षा अधिक तांदळाची खरेदी झाली आहे. गेल्या वर्षी या काळापर्यंत ४०५ लाख टन तांदळाची खरेदी झाली होती. पंजाबमध्ये २०३ लाख टन तांदूळ खरेदी झाला आहे. हे प्रमाण देशाच्या एकूण खरेदीपैकी ४० टक्के आहे. 

९५ हजार ५९६ कोटींची खरेदी 

तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाना, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि आंध्र प्रदेशला ५१ लाख ६६ हजार टन डाळी आणि तेलबियांची खरेदी करण्यास मूल्य समर्थन योजनेनुसार मान्यता देण्यात आली आहे. तसेच एक लाख २३ हजार टन खोबरे खरेदी करण्यात येणार आहे. ही खरेदी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, आणि केरळमध्ये करण्यात येणार आहे. इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अन्नधान्य मागणीचे प्रस्ताव पाठविल्यास त्यांच्यासाठी डाळी, तेलबिया आणि खोबरे खरेदी मूल्य समर्थन योजनेनुसार करता येणार आहे. 

नोडल संस्थांतर्फे झालेली खरेदी 

-तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, हरियाना, राजस्थान- मूग आणि उडीद, भुईमुगाच्या शेंगा, सोयाबीनची एक हजार ४४७ कोटी ५४ लाखांची खरेदी (एक लाख ४४ हजार ९६९ शेतकऱ्यांना फायदा). 
-कर्नाटक, तमिळनाडू- पाच हजार ८९ टन खोबऱ्याची ५२ कोटी ४० लाख रुपयांमध्ये खरेदी (तीन हजार ९६१ शेतकऱ्यांना फायदा). 
-पंजाब, हरियाना, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक आणि गुजरात- कापूस महामंडळाने ७७ लाख ९७ हजार ७५८ कापसाच्या गाठींची केली खरेदी (१५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिले २२ हजार ८१८ कोटी). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com