शेजारीच निघाले वैरी...चोरीसाठी चक्क बापलेकांनीच केला कुऱ्हाडीने वार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

देवपुरपाडे(ता.देवळा) येथे आज पहाटे (ता.११) पाच वाजता चोरीच्या उद्देशाने एका  महिलेचा खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर यामध्ये शेजारी राहणाऱ्या बापलेकांनीच कुऱ्हाडीने हल्ला केला असल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिक : देवपुरपाडे(ता.देवळा) येथे आज पहाटे (ता.११) पाच वाजता चोरीच्या उद्देशाने एका  महिलेचा खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर यामध्ये शेजारी राहणाऱ्या बापलेकांनीच कुऱ्हाडीने हल्ला केला असल्याची माहिती समोर येत आहे.

शेजारीच निघाले वैरी...

मृत महिलेचे नाव जिजाबाई विजय जोंधळे (वय अंदाजे ५०) असे असून तिचा मुलगा संदीप विजय जोंधळे (वय२७)या हल्ल्यात जखमी झाला आहे. असून 
जखमीला पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमी जोंधळे याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केल्याने देवळा ग्रामीण रुग्णालयात तात्पुरता उपचार केल्यानंतर मालेगाव येथे हलविण्यात आले. याचा  पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा > "चमत्कार झाला..! मालेगावात नेमके काय घडले?" सर्वत्र आश्चर्य..!

आरोपींची नावे अशी..

आरोपी अरुण बाबुराव गांगुर्डे(५१)
कमलेश अरुण गांगुर्डे(२३)
अंकलेश अरुण गांगुर्डे(१९)
विमलबाई अरुण गांगुर्डे(३९)(सहआरोपी)

हेही वाचा >  नाशिकमधील 'हे' गाव झालयं चक्क मुंबईतील धारावी.. कोणाचा कुठे ताळमेळ बसेना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For the purpose of stealing attacked at devpurpade nashik marathi news

टॉपिकस
Topic Tags: