COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

कतारहून आलेला प्रवासी मुंबईला पहाटे आला व तो बोरीवली नवापूर बसमध्ये बसला. ओझरला प्रवाशांमध्ये कुजबुज झाली आणि तो बाहेरच्या देशातून आल्याचे उघड झाले. होम क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या प्रवाशी परिवहन मंडळाच्या बसमध्ये आढळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ओझर पोलीसांच्या नाका बंदीत सदर बस थांबवली असता विमानप्रवास करून आलेला प्रवासी यात आहे का? अशी चौकशी करता बसमधील प्रवाशांनी पोलीस कर्मचा-यांना सदर प्रवाशाची माहीती दिली.

नाशिक : (ओझर) कतारहून आलेला प्रवासी मुंबईला पहाटे आला व 'तो' बोरीवली नवापूर बसमध्ये बसला. ओझरला प्रवाशांमध्ये कुजबुज झाली आणि तो बाहेरच्या देशातून आल्याचे उघड झाले. होम क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या प्रवाशी परिवहन मंडळाच्या बसमध्ये आढळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ओझर पोलीसांच्या नाका बंदीत सदर बस थांबवली असता विमानप्रवास करून आलेला प्रवासी यात आहे का? अशी चौकशी करता बसमधील प्रवाशांनी पोलीस कर्मचा-यांना सदर प्रवाशाची माहीती दिली.

असा आहे प्रकार

मुंबई - आग्रा महामार्गावर येथील नवीन इंग्रजी शाळेसमोर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पोलीसांची नाका बंदी सुरू असतांना बोरवली-नवापुर ही राज्य परिवहन मंडळाची एसटी बस (एमएच २०बीएल ३७६७) आली. प्रवाशांनी मोठमोठ्या ओरडत पोलीसांना बसमध्ये कोरोना संशयित बसला असल्याचे सांगितले. यावर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, अनुपम जाधव, नितीन कारंडे, भास्करराव पवार, विनोद वाघेरे, नागेश गायकवाड, भुषण शिंदे, एकनाथ हळदे आदीनी तातडीने एसटी बस बाजुला घेत प्रवाशांना खाली उतरवत बस रिकामी केली. याची माहीती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिका-यांना दिली. वैद्यकीय अधिका-यांनी सदर संशयिताची चौकशी केली असता तो आखाती देशातील कतार येथुन मुंबईला आला तेथुन चांदवड जात होता. सदर संशयिताची मुंबई विमानतळावर तपासणी होऊन त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारत त्याला गर्दीच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातली होती तरी देखील तो प्रवास करत असल्याने त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. 

Image may contain: one or more people, people standing, shoes, tree and outdoor

Image may contain: sky and outdoor

हेही वाचा > धक्कादायक! आंघोळीसाठी 'तीघी' तलावात उतरल्या...अन् थोड्या वेळाने मृतदेहच पडले बाहेर..

Image may contain: one or more people, tree, sky and outdoor

सदर संशयिताची मुंबई येथे कोरोनाची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणुन त्याला बाहेर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संपुर्ण बस धुऊन काढण्यात आली व प्रवाशांना घेऊन रवाना करण्यात आले.

हेही वाचा > धक्कादायक! आंघोळीसाठी 'तीघी' तलावात उतरल्या...अन् थोड्या वेळाने मृतदेहच पडले बाहेर..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Quarantine from Qatar intercepted the passenger at Ozar nashik marathi news