त्यांचा टार्गेट धावत्या गाडीतले प्रवासी...संधी साधून केला गेम..

running railway.jpg
running railway.jpg

नाशिक  : धावत्या रेल्वे गाडीने प्रवास करणारे प्रवासी इगतपुरीच्या निसर्गरम्य देखावा आपल्या मोबाईल कॅमेरात टिपण्याकरीता गाडीच्या दरवाजा व खिडकीतुन हातात मोबाईल धरुन फोटो व चित्रीकरण करतात. अशा प्रवाशांच्या हातावर काठीने किंवा धारदार शस्त्राने फटका मारून मोबाईल चोरी करणारी टोळी इगतपुरी लोहमार्ग पोलीसांनी मोठया शिताफीने सापळा रचुन रविवारी ( ता.19 रोजी ) गजाआड केली 
असुन त्यांच्याकडून पावनेलाख रुपये किमतींचे सोळा मोबाईल जप्त केले.


असा आहे प्रकार...

फिर्यादी तुषार रमेश पवार (रा. दिंडोरी, नाशिक) हे 13 जानेवारीला नाशिकरोडहुन नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसने जनरल बोगीतुन गाडीच्या दरवाजात बसुन 
प्रवास करीत असतांना इगतपुरी बोरटेंभे शिवारात गाडीचा वेग कमी होत असतांना काही अज्ञात चोरटयांनी त्यांच्या हातावर फटका मारून विवो कंपनीचा ( 13,291 रुपये किमतीचा ) मोबाईल खाली पाडून चोरी केला. याची तक्रार पवार यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल केली. यानंतर सलग तीन दिवस अशा मोबाईल चोरीचे सत्र सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आल्याने लोहमार्ग पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी सापळा लावुन पोलीस पथक रेल्वे स्थानक परिसरात सतर्क केले. यात पोलीस हवालदार अंबादास कातोरे यांनी नाशिकहुन तपोवन एक्सप्रेसच्या जनरल बोगीत प्रवास करीत घटना स्थळावर प्रवासी असल्याचा भास दर्शवित दरवाजात मोबाईल हातात घेवुन बसले. बोरटेंभे शिवार येताच अज्ञात चोराने त्यांच्या हातावर फटका मारताच रेल्वे पोलीस पथकाने चोरांचा पाठलाग केला व तीन चोरांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांच्याकडे विविध कंपन्याचे 16 मोबाईल असे 1 लाख 84 हजार 337 रुपये किंमतीचा मुद्देमालासह धारदार शस्त्र अज्ञातांकडुन ताब्यात घेतले. 

तिन्ही संशयीत आरोपीस केली अटक

पावनेदोन लाख रुपयांच्या मुद्देमालासह धारदार शस्त्र जप्त रेल्वे पोलिसांनी 
लावलेल्या सापळ्यात राहुल रमेश साळवे ( वय 20 वर्ष रा. मिलिंदनगर, इगतपुरी), ललित सदाशिव मोरे ( वय 22 वर्ष, रा.राहणार मिलिंदनगर, इगतपुरी) 
विशाल दत्ता आतकरी ( वय 23 वर्ष, रा. बोरटेंभे, इगतपुरी) या तिन्ही संशयीत आरोपीस पोलिसांनी अटक करून पोलीस कोठडी देण्यात आली. संशयीत आरोपींपैकी राहुल साळवे (वय 20 वर्ष ) याच्यावर घोटी पोलीस ठाणेसह अनेक ठिकाणी या अगोदर अनेक गुन्हे दाखल आहे. तर लोहमार्ग पोलीस स्टेशन इगतपुरीतही चोरी दरोडा अशी गुन्हे दाखल आहेत. 

गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी विशेष यंत्रणा कार्यरत

पुढील गुन्ह्याच्या तपासासाठी लोहमार्ग पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, लोहमार्ग पोलीस मनमाडचे विलास मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी लोहमार्ग सहाय्यक पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या पथकात पोलीस कर्मचारी मुरारी गायकवाड, अंबादास कातोरे, हेमंत घरटे, दिपक निकम, दिपक निकम, सतीश खर्डे आदी तपास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com