PHOTOS : मालेगाव बंदोबस्तासाठी लोहमार्ग पोलीस दाखल..पोलीस अधीक्षक आरती सिंग यांचे मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 9 May 2020

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे मालेगावात आहेत. मालेगावात वाढत असलेली रुग्णसंख्या तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मालेगाव येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासाठी लोहमार्ग पोलीसचे 35 अधिकारी आणि 350 कर्मचारी शनिवारी (ता.९) मालेगावी दाखल झाले. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी या सर्वांना मार्गदर्शन करत तात्काळ कर्तव्यावर हजर होण्याच्या सूचना केल्या. 

नाशिक / मालेगाव  : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे मालेगावात आहेत. मालेगावात वाढत असलेली रुग्णसंख्या तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मालेगाव येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासाठी लोहमार्ग पोलीसचे 35 अधिकारी आणि 350 कर्मचारी शनिवारी (ता.९) मालेगावी दाखल झाले. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी या सर्वांना मार्गदर्शन करत तात्काळ कर्तव्यावर हजर होण्याच्या सूचना केल्या. 

Image

मालेगावकरांसाठी शनिवारची सकाळ चिंताजनक...कारण...

कोरोनाचा फैलाव बघून कोरोनाचा धोका वाढतोय असेच चिन्ह दिसत आहे. मालेगावमध्ये शनवारची सकाळ चिंताजनक निघाली. शनिवारी (ता.९) सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये मालेगावात ४९, नाशिक शहरात १ असे नवीन ५० कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून ही चिंताजनक बाब आहे.याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि शहरात कोरोनाने आता शिरकाव केला आहे.

Image

हेही वाचा > मालेगाव भीषण वास्तव! "रोज उठ रहे जनाजोंसे सबक न सिका तो.."सहा दिवसांत चक्क 'इतके' मातीत दफन 

मालेगावचा कोरोना इफेक्ट...औरंगाबादच्या ७२ सीआरपीएफ जवानांना कोरोनाची लागण 

मालेगावात दीड महिना बंदोबस्त करून परतलेल्या औरंगाबाद राज्य राखीव पोलिस दलाच्या डी कंपनीतील 72 जवानांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजते. कोरोनाचा उद्रेक वाढू लागल्यानंतर २३ मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर देशभर पोलिसांचा बंदोबस्त तैनात झाला. गरजेनुसार मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, मालेगाव, औरंगाबाद अशा ठिकाणी एसआरपीएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते.

Image

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!

Image

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Railway police on duty for Malegaon security nashik marathi news