photos : पावसाच्या सरी बघून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर धास्ती वाढली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज आज शहरात खरा ठरला. शहर व परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या अर्थात पावसाचे प्रमाण अधिक नसले तरी कोरोना  प्रादुर्भावाच्या धर्तीवर नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. 

नाशिक : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज आज शहरात खरा ठरला. शहर व परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या अर्थात पावसाचे प्रमाण अधिक नसले तरी कोरोना प्रादुर्भावाच्या धर्तीवर नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. 

कोरोना विषाणुसाठी हे पुरक वातावरण; नागरिकांत भीती

कोरोना विषाणु उष्णतेने नाहीसा होतो पावसाने मात्र हवेत काहीसा गारवा निर्माण केल्याने ही भिती निर्माण झाली आहे. शहर व परिसरात दुपारी एक वाजेनंतर अचानक वातावरणात बदल झाला. उन्हाची तीव्रता कमी होऊन ढगाळ हवामान झाले. सिडको, सातपूर भागात दुपारी तीन वाजेच्या सुमारास पावसाच्या हलकी सरी कोसळल्या, शहरातही याच दरम्यान काही प्रमाणात पाऊस झाला. नाशिकरोड, एकलहरे भागात विजांचा कडकडाट झाला. तसेच, सिन्नरला देखील मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावर जी काही तुरळक गर्दी दिसतं होती ती नाहीशी झाली. 

Image may contain: sky, tree and outdoor

हेही वाचा > COVID-19 : 'शहराने पैसे कमवायला शिकवलं अन् गावाने निरोगी आरोग्य सांभाळायला!'...नोकरदार गावाकडे परतले

Image may contain: tree, outdoor and nature

कोरोना विषाणु अतिउष्णतेत नाहीसा होत असल्याने उन्हाळ्यातही अधिक उष्णता वाढावी अशी अपेक्षा असलेल्या नागरिकांच्या मनात पावसाने काही वेळ भिती निर्माण केली होती. चार वाजेनंतर पुन्हा उष्णता वाढल्याने पावसाचा परिणाम जाणवला नाही. ग्रामीण भागात मात्र काढणीला आलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण केली आहे. 

हेही वाचा > सीईटी परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित; सीईटी सेलचा निर्णय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain in Nashik city and surrounding area nashik marathi news