मालेगाव महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे राजाराम जाधव विजयी

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 27 October 2020

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे गटनेता राजाराम जाधव हे विजयी झाले आहेत. त्यांनी महागटबंधन आघाडीच्या अन्सारी सबीहा मोहंमद मुजम्मील यांचा पराभव केला. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीसाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २७) समिती सदस्यांची सभा पार पडली.

मालेगाव (जि.नाशिक) : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे गटनेता राजाराम जाधव हे विजयी झाले आहेत. त्यांनी महागटबंधन आघाडीच्या अन्सारी सबीहा मोहंमद मुजम्मील यांचा पराभव केला. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीसाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २७) समिती सदस्यांची सभा पार पडली. स्थायी सभापतिपदासाठी शिवसेना व काँग्रेस आघाडीचे राजाराम जाधव व महागठबंधन आघाडीच्या अन्सारी सबीहा मोहंमद मुजम्मील यांच्यात लढत झाली.समितीतील सर्व १५ सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विशेष सभेत सहभागी झाले होते

जाधव यांची सभापतिपदी निवड निश्‍चित 
येथील शिवसेना, काँग्रेस व भाजप असे दहा सदस्यांचे स्पष्ट बहुमत असल्याने  जाधव यांची सभापतिपदी निवड निश्‍चित होती. सोमवारी (ता. २६) सायंकाळी सत्तारूढ गटाने या सर्व दहा सदस्यांना एकत्रित केले होते. मंगळवारी सभेला एकाच ठिकाणाहून ते उपस्थित होते, तर महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी भाजप नगरसेविका सुवर्णा शेलार, तर उपसभापतिपदी काँग्रेसच्या रेहानाबानो ताजुद्दीन यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपने सत्तारूढ आघाडीला पाठिंबा दिल्याने भाजपला महिला व बालकल्याण समिती सभापतिपदाची संधी दिली आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

महागटबंधनच्या अन्सारी यांचे अर्ज वैध ठरले
प्रथम छाननी होऊन सेनेचे जाधव व महागटबंधनच्या अन्सारी यांचे अर्ज वैध ठरले. हात उंचावून मतदान नोंदविण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. प्रथम अन्सारींसाठी मतदान होऊन त्यांना पाच मते मिळाली. तर जाधव यांना सेना, काँगेस व भाजपची १० मतं मिळून विजयी झाले. आयुक्त त्र्यंबक कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुरकर, प्रभारी नगरसचिव पंकज सोनवणे यांनी निवडणूक प्रक्रियेत सहाय्य केले.

हेही वाचा > पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajaram Jadhav is chairman of Malegaon Municipal Corporation standing committee nashik marathi news