"रक्षाबंधनच्या' पवित्र नात्याचा बंध केला आणखी घट्ट! परिचारिकांनीच बांधल्या कोरोनाबाधितांना राख्या..

rakhi at hospital.png
rakhi at hospital.png

नाशिक : 'रक्षाबंधन' म्हणजे भावा बहिणीचं नातं जपणारा सण!! या पवित्र नात्याचा बंध आणखी घट्ट करत गोडवा निर्माण करणारा सण..! कोरोनाच्या या संकटात घराघरातील भावा-बहिणींसोबतच, लढाईत मैदानात उतरून सर्वांची रक्षा करणाऱ्या, सोबतच आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपणाऱ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. पण जे कोरोनाबाधित आहेत. ज्यांना आपल्या परिवाराला भेटता येत नाही. अशांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी नाशिकमधील डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटल येथे अनोख्या पद्धतीने हा सण साजरा करण्यात आला. 

मराठीत परिचारिका आणि इंग्रजीत सिस्टर..आणि सिस्टर म्हणजे बहिणच..!

नाशिकमधील डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटल येथील परिचारीकांनी कोरोना बाधित रुग्णांच्या हातावर राखी बांधून त्यांचा रक्षाबंधन सण गोड केला आहे. अंगावर पीपीई कीट घालून परिचारिकांनी रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांना राखी बांधली. रक्षाबंधनाच्या दिवशी हे फोटो व्हायरल होत आहेत दवाखान्यात उपचार घेत असताना या परिचारिका अहोरात्र रुग्णांची सेवा करत असल्याने सध्या त्याच आता सिस्टर म्हणजेच बहिणींप्रमाणे रुग्णांच्या अधिक जवळच्या वाटू लागल्या आहेत. जिथे परिवारालाही भेटता येत नसल्याने परिचारिका आणि  रुग्णांचा जवळून संबंध येतो. डॉक्टरांनी दिलेले मेडिसिन रुग्णांना वेळेवर देणे, रुग्णांची काळजी घेण्याचे काम या परिचारिकाच करत असतात.

कोरोना काळातली ही आठवण साक्षीला

यंदा जगभरात कोरोनाचे सावट असल्याने  बहिणी आपल्या भावांना राखी बांधण्यासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून येत नाही.तर रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या सिस्टर्स म्हणजेच परिचारिका देखील हा सण साजरा करू शकल्या नाहीत. मात्र, या सणाची आठवण साक्षीला असावी यासाठी नाशिकमधील डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटल येथे आज सकाळी अनोखा रक्षाबंधन सोहळा बघायला मिळाला.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com