"राष्ट्रवादीला बौद्धांची मते मिळणे शक्‍य नाही" - आठवले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

मी जोपर्यंत मोदींबरोबर आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला बौद्धांची मते मिळणे शक्‍य नाही. इंदू मिलची पाहणी झालेली असून, पाठपुरावा सुरू आहे. इंदू मिलचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. असे आठवले म्हणाले.

नाशिक : मी जोपर्यंत मोदींबरोबर आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला बौद्धांची मते मिळणे शक्‍य नाही. इंदू मिलची पाहणी झालेली असून, पाठपुरावा सुरू आहे. इंदू मिलचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. मुस्लिम समाजाला बळीचा बकरा केले जात आहे, म्हणून या देशाला कायदा समजून घेण्याची आवश्‍यकता आहे, असे ते म्हणाले. असे केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी (ता. 22) येथे सांगितले. नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्तालयात बुधवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. 

भाजप राजसोबत गेल्यास मी विरोधात 

भाजपला मनसेचा फायदा नाही. राज ठाकरे पॉलिटिकली शून्य आहेत. राज ठाकरेंबरोबर भाजप असेल तर मी विरोधात जाईन. "नाइट लाइफ'मुळे गुन्हेगारीला आमंत्रण मिळणार आहे. महिलांनाही मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागणार आहे. म्हणून नाइट लाइफला माझ्या पक्षाचा विरोध आहे असे आठवले म्हणाले.

Image may contain: one or more people, people sitting and indoor

विविध योजनांचा आढावा 
आढावा बैठकीत ऍट्रॉसिटी, जनधन, आयुष्यमान भारत योजना यांसह विविध शासकीय योजनांची माहिती श्री. आठवले यांनी घेतली. प्रधानमंत्री आवास योजनेला 2022 मध्ये 95 वर्षे पूर्ण होत असून, गरिबांना शौचालय असायला हवे, गॅस सिलिंडर असायला पाहिजे. यासाठी शासन विविध उपाय योजना करीत आहे. त्याचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोचवा, असे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी महसूल आयुक्तालयाबाहेर आठवले यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. 

हेही वाचा > अजितदादांच्या मातोश्री म्हणतात.."त्रिमुर्तींचे सरकार टिकू दे..!" 

नाशिक विभागीय आयुक्तालयात बुधवारी आढावा बैठक झाली. बैठकीस महसूल आयुक्त राजाराम माने, उपायुक्त रघुनाथ गावडे, पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, ग्रामीण पोलिस आयुक्त आरती सिंह, नाशिकचे समाजकल्याण उपायुक्त भगवान वीर आणि महसूलच्या विभागीय खात्याचे अधिकारी या वेळी बैठकीला उपस्थित होते. 

हेही वाचा > थरारक! "तू चल नाही तर ठार करिन"..कानपट्टीवर पिस्तूल लावत 'त्याची' लग्नाची गळ..

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athawale statement on NCP Nashik Marathi Political News