भाविकांनो, बिनधास्त करा रामकुंडाचे तिर्थप्राशन!...कारण...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

समितीला दोन महिन्यांनी उच्च न्यायालयात उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करावा लागतो. प्रशासनातर्फे गोदावरी व उपनद्या स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहे.

नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोदावरीतील रामकुंडातील पाणी प्रवाहित राहण्याबरोबरच स्वच्छ पाण्यात स्नान करता यावे व स्वच्छ पाणी भाविकांना तीर्थ म्हणून प्राशन करता यावे, यासाठी लक्ष्मणकुंड येथे मंत्राज ग्रीन रिसोर्स या नाशिकस्थित कंपनीतर्फे पाण्यातील रासायनिक व जैविक घटकांचे विघटन करणारी यंत्रणा उभारली जाणार आहे. 

गोदावरीचे महात्म्य कमी होण्याची भीती

स्मार्टसिटी अंतर्गत हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविला जाणार असून, रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करण्याचा एक प्रयोग नुकताच महापालिकेत यशस्वी झाल्याने प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाणार आहे. शहरातून जाणाऱ्या गोदावरीवरील रामकुंड लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. परंतु, काही वर्षांत नदीनाल्यांचे, कंपन्यांमधून 
रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषित होऊन गोदावरीचे महात्म्य कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या नीरी संस्थेने गोदावरी स्वच्छतेसाठी सूचना केल्या असून, उपाय योजनां च्या अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. 

मंत्राज ग्रीन रिसोर्स व ट्रायझेन कंपनीसोबत चर्चा करण्याच्या सूचना

समितीला दोन महिन्यांनी उच्च न्यायालयात उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करावा लागतो. प्रशासनातर्फे गोदावरी व उपनद्या स्वच्छतेसाठी 
मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून किमान रामकुंडाचे पाणी स्वच्छ राहण्यासाठी रासायनिक व जैविक घटकांचे विघटन करणारे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाणी स्वच्छतेचा प्रयोग राबविला जाणार आहे. स्मार्टसिटीअंतर्गत हा प्रयोग राबविला जाणार असून, मंत्राज ग्रीन रिसोर्स व ट्रायझेन कंपनीसोबत चर्चा करण्याच्या सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या. यापूर्वी रामकुंडात थेट पाइपलाइनद्वारे पाणी सोडून भाविकांना स्वच्छ पाणी देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. 

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...

Image may contain: one or more people and outdoor

...असे होईल पाणी स्वच्छ 

रामकुंडात स्नानाबरोबरच विधी व श्राद्ध केले जात असल्याने याद्वारे पाण्यात मोठ्या प्रमाणात जैविक व रासायनिक पदार्थ आढळत असल्याचे मंत्राज ग्रीन रिसोर्सच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. या पदार्थांमधील जैविक घटकांमुळे पाण्यात विशिष्ट वनस्पतीची वाढ होते. जैविक विघटन व रासायनिक पदार्थांचे एकाच वेळी योग्य विघटन झाल्यास पाणी स्वच्छ होण्यास मदत होत असल्याचे प्रयोगाअंती स्पष्ट झाले. पाण्यातील दूषित घटकांचे विघटन करण्यासाठी जीवाणूंची निर्मिती करण्यात आली असून, हे जीवाणू पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची वाढ थांबवितात. प्रदूषण थांबविणारे जीवाणू अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने एका विशिष्ट बायोकार्टरेजमध्ये स्थापित केलेले असतात. त्यामुळे जेव्हा पाण्यातील विघटनशील पदार्थांचा या बायोकार्टरसोबत संपर्क होतो तेव्हा आतील जीवाणू हे विघटनाची प्रक्रिया पूर्ण करतात, असा दावा मंत्राज ग्रीन रिसोर्स लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. यू. के. शर्मा यांनी केला.  

हेही वाचा > 'आई नको न रडू!'...असं म्हणत 'तो' ही रडू लागला...अन् तेवढ्यात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramkunda water will be clean nashik marathi news