तीन वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर 'तिने' लग्नाचे विचारले...प्रियकराचे उत्तर ऐकून धक्काच!

depression woman.jpg
depression woman.jpg

नाशिक : नाशिक शहर-परिसरात महिला अत्याचाराच्या तीन गुन्ह्यांची नोंद पोलिसांत झाली आहे. एका गुन्ह्यात संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे एकीवर बलात्कार, तर दोन घटनांमध्ये विनयभंग केल्याची घटना घडली आहे.  या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवून, नंतर लग्नास नकार दिल्याप्रकरणी संशयिताविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा घडला गुन्हा...
सागर राजेंद्र खताळ (रा. अमृत पार्क, हॉटेल एक्‍स्प्रेस इनजवळ, पाथर्डी शिवार) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला त्याच्या राहत्या घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र तीन वर्षाच्या प्रेमसंबंधानंतर तिने लग्नाबद्दल विचारले असता, त्याने लग्नाला नकार तर दिलाच..उलट संशयिताने शिवीगाळ करीत मारहाण केली. संशयिताने तीन वर्षांपासून पीडितेवर बलात्कार केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक निरीक्षक आर. एस. भामरे तपास करीत आहेत. 

 दुसरी घटना.... त्याने घरात घुसून दिर अन् वहिनीला मारले...

चुंचाळे शिवारात संशयिताने घरात घुसून विवाहितेचा विनयभंग करीत पीडितेच्या दीरास मारहाण केल्याची घटना घडली. सुमीत लंगोटे (रा. घरकुल योजना, चुंचाळे शिवार, अंबड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार सोमवारी (ता. 17) सकाळी साडेदहाच्या सुमारास पीडित विवाहिता घरात असताना संशयित सुमीत घरात शिरला आणि विवाहितेला पाठीमागून येऊन मिठी मारली. त्यानंतर त्याने अश्‍लील चाळे करीत विवाहितेचा विनयभंग केला. तसेच पीडितेच्या दीरास शिवीगाळ करीत मारहाण केली आणि पाहून घेण्याची धमकीीराची दिली. याप्रकरणी अंबड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक म्हात्रे तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com