PHOTOS : नाशिकमध्ये होतयं "डायनासोर'च्या छोट्या कॉपीचे दर्शन! पाहा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

गळ्यातील निळा, काळा आणि लाल रंगाचा गळा उंच दगडावर बसून मादीला आकर्षित करण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्याला आव्हान देण्यासाठी बाहेर काढतो. तो हे रंग आत-बाहेर घेत असतो. तसेच कीटकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो​

नाशिक : निसर्गप्रेमी कोल्हापूर, सातारा ज्या सरड्याला पाहायला गाठायचे, अशा फॅन थ्रोटेड सरड्याचे दर्शन नाशिकमध्ये घडू लागलेय. हा सरडा देशात सर्वत्र आढळतो. श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तानमध्ये त्याचे वास्तव्य आहे. लॉकडाउन फोरमध्ये निसर्गामध्ये वसंतातील फुलांचा सडा अनुभवायला मिळत असताना स्थलांतरित पक्षी, वन्यप्राणी गावाजवळ पाहायला मिळत आहेत. गिधाडे शहराजवळ दिसू लागली आहेत. 

मे आणि जूनमध्ये "ब्रीडिंग सीझन'

सरड्यांचा मे आणि जूनमध्ये "ब्रीडिंग सीझन' असतो. या जातीच्या सरड्यातील नर हा त्याच्या गळ्यातील निळा, काळा आणि लाल रंगाचा गळा उंच दगडावर बसून मादीला आकर्षित करण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्याला आव्हान देण्यासाठी बाहेर काढतो. तो हे रंग आत-बाहेर घेत असतो. तसेच कीटकांना आकर्षित करण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो.

(छायाचित्रे - आनंद बोरा)

Image may contain: bird

हेही वाचा > शहर हादरून सोडल्यानंतर चोरपावलांनी 'त्याचा' गावात प्रवेश...अन् बघता बघता घातला घट्ट विळखा

हे सरडे मोकळ्या मैदानावर राहणे पसंत करतात. सरड्याची लांबी आठ इंच असून, त्याची शेपूट पाच इंच असते. शरीरापेक्षा शेपूट लांब असते. सरड्याचे कार्यक्षेत्र ठरलेले असते. त्यांनी दुसऱ्याच्या जागेत जाण्याचा प्रयत्न केल्यावर दोन नर एकमेकांना भिडतात. त्या वेळी त्यांचे खरे सौंदर्य पाहायला मिळते. अंगावर सप्तरंग उमटलेले दिसून येतात. अगदी "डायनासोर'ची छोटी "कॉपी' भासते. 

Image may contain: plant

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

No photo description available.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rare "fan-throated" lizard seen in Nashik marathi news