पेठ रोड परिसरात आढळला दुर्मिळ निमविषारी साप; अत्यंत चपळ सापाची वैशिष्ट्ये एकदा वाचाच

Rare semi-venomous Patteri sand snake found in Peth Road area
Rare semi-venomous Patteri sand snake found in Peth Road area

नाशिक : पेठ रोडवरील साहेबराव मोरे यांच्या घरात दुर्मिळ निमविषारी पट्टेरी रेती साप आढळला. त्यांनी सर्पमित्र राहुल नाईक यांना दूरध्वनी करून बोलावले. नाईक यांनी सापाला पकडले. १०७ सेंटिमीटर (तीन फूट सहा इंच), फिकट तपकिरी अथवा हिरव्या शरीरावर समांतर धावणाऱ्या पाच तपकिरी रेषा. पोटाचा भाग पिवळसर पांढरा, तपकिरी डोक्यावर गडद तपकिरी रेषा, मोठे डोळे, लांब, सडपातळ शरीर रचना असलेला हा साप दुर्मिळ आहे. या सर्पाची मादी अंडी घालते तसेच सरडे, सापसुरळी, उंदीर, बेडूक व क्वचितप्रसंगी सापदेखील हा साप खात असतो.

रेती साप

महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्‍चिम बंगाल आदी ठिकाणी तो सापडतो. खडकाळ प्रदेश, खुरटी जंगले हे त्याचे मुख्य घर आहे. हा साप दिनचर असून, शिकार करताना चपळ आणि सरपटताना डोके वर उचलतो. नाव रेती साप असले तरी कधीच रेतीमध्ये आढळत नाही. मुख्यतः जमिनीवर राहत असला तरी झाडांवरही उत्तम रीतीने चढू शकतो. साप विषारी आहे की बिनविषारी, हे ओळखण्यासाठी सापांबद्दल प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे. देशात सुमारे २७० पेक्षा अधिक जाती आढळतात. या जातींपैकी फक्त काही जाती विषारी आहेत.

सापांचे प्रकार 

सापांचे वर्गीकरण बिनविषारी, निमविषारी, विषारी अशा प्रकारेही केले जाते. बिनविषारी साप चावला तर कोणताही धोका संभवत नाही. निमविषारी साप हे विषारी असतात; परंतु त्यांच्या चावण्यामुळे जीव जाईल इतका धोका नसतो. विषारी साप यांचे विष धोकादायक व प्राणघातक असते. सापाची वन विभागात नोंद करून सर्पमित्र विशाल बाफना व बबलू कुमावत यांनी त्याला सुरक्षित अधिवासात सोडून दिले.

रिपोर्ट - महेंद्र महाजन

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com