आता कोरोना रुग्णांच्या लुटीला बसणार चाप.."असे' आहेत खासगी रुग्णालयांचे दर   

बुधवार, 1 जुलै 2020

कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारींमुळे महापालिकेच्या दर नियंत्रण समितीने आता रुग्णाची प्रकृती व बेडनुसार दर निश्‍चित केले आहेत. 

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेची रुग्णालये फुल झाल्याच्या माहितीवर खासगी रुग्णालयांकडे रुग्णांनी धाव घेतली. परंतु खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारणी होऊन लाखो रुपये लाटले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने याविरोधात मैदानात उतरून तक्रारदारांसाठी थेट हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिल्याने महापालिका प्रशासन ऍक्‍शन मोडमध्ये आले आहे.

रुग्णाची प्रकृती व बेडनुसार दर निश्‍चित

कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारींमुळे महापालिकेच्या दर नियंत्रण समितीने आता रुग्णाची प्रकृती व बेडनुसार दर निश्‍चित केले आहेत. कमीत कमी चार, तर जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रतिदिन दरनिश्‍चिती केली आहे. या संदर्भातील नियमावली आज (ता. 1) प्रसिद्ध केली जाणार आहे.

 महापालिका प्रशासन ऍक्‍शन मोडमध्ये

खासगी रुग्णालयांकडून आकारलेल्या दरांबाबत शासनाने स्पष्ट निर्देश दिले असून, त्याच आधारे महापालिकेच्या दर नियंत्रण समितीने दर निश्‍चित केले आहेत. समितीचे अध्यक्ष व लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णाची प्रकृती व बेडनुसार कमीत कमी चार हजार, तर जास्तीत जास्त नऊ हजार रुपये दर लागू करता येतील. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

पीपीई किटसह मास्कचा दर विभागून 
रुग्णालयाच्या एखाद्या वॉर्डमध्ये एकापेक्षा अधिक रुग्ण असले तरी प्रत्येक रुग्णाची स्वतंत्र तपासणी करताना स्वतंत्र पीपीई किट, मास्क, हॅंडग्लोव्हज, सॅनिटायझरचा दर आकारला जात होता; परंतु महापालिकेच्या नव्या नियमावलीनुसार एका कक्षात अनेक रुग्ण असतील, तर त्यांच्यात तो दर विभागला जाणार आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

असे असतील दर 
रूटिन वॉर्ड आयसोलेशनसाठी चार हजार रुपये, आयसीयू वॉर्डासाठी साडेसात हजार रुपये, आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर रुग्ण असेल तर नऊ हजार रुपये दर आकारणी होईल. यात डॉक्‍टरांची नियमित तपासणी, युरिन, सीबीसी, इको टुडी, एक्‍स-रे, एचआयव्ही, ईसीजी, नर्सिंग चार्जेस, जेवण व नाश्‍त्याचा समावेश असेल.