अंतिम वर्षाच्या वंचित विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षा; ऑनलाइन पद्धतीने ५ ते ७ नोव्हेंबरपर्यंत आयोजन  

10th students.jpg
10th students.jpg

नाशिक : अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नोव्हेंबरमध्ये पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. 

पुनर्परीक्षा घेण्याचे नियोजन

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत वेळेत निर्णय होऊ शकला नाही. अखेर न्यायालयात सुनावणीनंतर यंत्रणा कामाला लागली होती. विद्यार्थांचे नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन्ही पर्याय विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यात आले. त्यानुसार गेल्या १२ ऑक्टोबरपासून ऑनलाइन व ऑफलाइन सुरू झालेल्या या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा लॉगीन न होणे, परीक्षा सुरू होणे, सर्व्हर एरर, टेक्स्ट सबमिट न होणे, चुकीच्या प्रश्‍नपत्रिका उपलब्ध होणे, राज्य सामाईक परीक्षा (सीईटी) व अन्य शासकीय स्पर्धा आदी परीक्षांसोबतच विद्यापीठाच्या परीक्षा आदी कारणांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. त्याअनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारींबाबत बैठक होऊन येत्या ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन स्वरूपात पुनर्परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वेबपोर्टलवरील गुगल फॉर्ममध्ये माहिती भरावी

ज्या विद्यार्थ्यांकडून तक्रारी आल्या, अशाच विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे संबंधित अपेक्षित तपशील व अन्य माहिती २ नोव्हेंबरपर्यंत पाठवली जाणार आहे. तक्रारी प्राप्त होऊनही ज्यांना ऑनलाइन परीक्षेबाबत ई-मेल प्राप्त झालेले नसतील, अशा विद्यार्थ्यांनी ३ नोव्हेंबरला रात्री बारापर्यंत विद्यापीठाच्या वेबपोर्टलवरील गुगल फॉर्ममध्ये माहिती भरावी, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com