रिलायन्स जिओसाठी वीज विभागाच्या पायघड्या; अत्यल्प दरात खांबांवरून ऑप्टिकल फायबर टाकणार

Red carpet for Reliance Jio from Nashik Municipal corporation
Red carpet for Reliance Jio from Nashik Municipal corporation

नाशिक : एकीकडे शहर सौंदर्यीकरणाला बाधा पोचत असल्याने महावितरणकडे तगादा लावणाऱ्या महापालिकेने स्वमालकीच्या ९० हजार खांबांवरून अगदी कमी किमतीत म्हणजे प्रतिखांब एक रुपया दराने ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. खांबावरून केबल टाकल्यास रिलायन्स जिओ कंपनीचा आर्थिक फायदा होईलच, शिवाय स्मार्टसिटी नाशिकचे सौंदर्य धोक्यात येणार आहे. पेस्ट कंट्रोलपाठोपाठ महापालिकेचा हा प्रतापही चर्चेत आला आहे. 

महापालिकेच्या उत्पन्नात घट होत असल्याच्या नावाखाली वीज विभागाकडून खांबांवरून ऑप्टिकल फायबर केबल शहरभर टाकण्याचा घाट घातला जात आहे. महापालिकेचे ९० हजार खांब आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात पंधरा हजार खांबांवरून रिलायन्स जिओतर्फे ऑप्टिकल फायबर केबल टाकली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वीज विभागाने पुढाकार घेतला आहे. सोलापूर महापालिकेने अशा पद्धतीने महापालिकेच्या मालकीचे वीजखांब भाडेतत्त्वावर दिले आहेत. त्याच आधारे नाशिकमध्ये केबल टाकली जाणार आहे. भूमिगत केबल टाकल्यास चार ते पाच फूट रुपये दर लागू होतो. भूमिगत तारांसाठी आग्रही असलेल्या नगसेवकांची भूमिका यात महत्त्वाची ठरणार आहे. 

खर्च वाचविण्यासाठी धडपड 
ऑप्टिकल फायबर टाकण्यासाठी यापूर्वी महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले. रस्ता खोदण्यासाठी सुमारे पन्नास कोटींचा निधी महापालिकेला मिळाला होता. साधारण चार ते पाच हजार रुपये फुटाप्रमाणे खर्च येत असल्याने वीज खांबांवरून केबल टाकली जाईल. डिसेंबरमध्ये यासाठी महासभेची मान्यता घेण्यात आली. त्यानंतर जीएसटीसह एक रुपया अठरा पैसे दर निश्चित करण्यात आला. त्यानुसार डिमांड नोट तयार करण्यात आली असून, वार्षिक सत्तर लाख रुपये भरून घेतल्यानंतर करार केला जाणार आहे. 

शहर सौंदर्यीकरणाला बाधा 
मूळात स्मार्टसिटीअंतर्गत शहरातील उघड्यावरील तारा भूमिगत केल्या जाणार आहेत. वीज वितरण कंपनीने तारा भूमिगत करण्यासाठी ८० कोटींचा निधी मंजूर केला. तारा भूमिगत करण्यामागे धोका कमी करण्याबरोबरच शहर सौंदर्यीकरण करणे हा आहे. महापालिकेच्या ९० हजार वीज खांबांवरून केबल गेल्यास सौंदर्याला अधिक बाधा पोचणार आहे. 
 
संपादन - मनीष कुलकर्णी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com