"लॉकडाऊन.. वडिलांच्या अस्थी विसर्जनासाठी रितसर परवानगी...तरीही गुन्हा दाखल?" 

asthi visarjan.jpg
asthi visarjan.jpg

नाशिक / त्र्यंबकेश्‍वर : वडिलांच्या मृत्यूनंतर अस्थी विसर्जनाला आलेले कुटुंब रितसर परवानगीने शहरात विधीसाठी आले होते. तरीही गुन्हा दाखल अशा तक्रारी अन्आरोप पुरोहितांनी केला आहे.  पण नेमके काय घडले?

असा घडला प्रकार

गोविंद मुळे यांच्याकडे मुंबईहून आलेल्या तीन व्यक्तींनी पौरोहित्य करून अस्थी विसर्जनाची पूजा केली. ते निघून गेल्यावर स्थानिक कार्यकर्त्यांनी पालिकेत पुरोहिताविरोधात तक्रार केल्याने पालिकेचे कर निरीक्षक विजय सोनार, अमोल दोंदे, नितीन शिंदे आदींनी मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्यात संबंधित पुरोहिताविरोधात तक्रार देत लॉकडाउनच्या काळात संसर्गजन्य आजार पसरविण्याच्या नियंत्रण कायद्याच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, वडिलांच्या मृत्यूनंतर अस्थी विसर्जनाला आलेले कुटुंब रितसर परवानगीने शहरात विधीसाठी आले होते. मात्र, पुरोहितांच्या अडवणुकीसाठी अशा तक्रारी झाल्याचा आरोप पुरोहितांनी केला आहे.  

पुरोहितावर त्र्यंबकला गुन्हा 

लॉकडाउनमुळे मनाई असताना धार्मिक पूजाविधी केल्याबद्दल गोविंद मुळे या पुरोहिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मुंबईहून वडिलांच्या मृत्यूनंतर अस्थी विसर्जनाला कुटुंबीयांना रितसर परवानगी असूनही केवळ स्थानिक कार्यकर्त्यांच्या अडवणुकीतून ही तक्रार केल्याचा पुरोहितांचा आरोप आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com