धक्कादायक! भोळया भाबड्या शेतकऱ्यांची फसवणूक.. मोठा काळाबाजार उघडकीस..कृषी विभागाची कारवाई

yeola kalabajar 111.jpg
yeola kalabajar 111.jpg

नाशिक / येवला : येवला येथे अशा प्रकारचा काळाबाजार यापूर्वी अनेकदा उघडकीस आला आहे.आताही असा प्रकार होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. तालुक्यातील जळगाव नेऊर येथे एका प्रतिष्ठित विक्रेत्यांकडे हा काळाबाजार उघड झाला असून तब्बल २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काळाबाजार उघडकीस... शेतकऱ्यांची फसवणूक 

येवला येथे खतांचा काळाबाजार यापूर्वी अनेकदा उघडकीस आला आहे.आताही असा प्रकार होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. तालुक्यातील जळगाव नेऊर येथील सागर कृषी सेवा केंद्रात शेतक-यांसाठी विक्रीसाठी ठेवलेला अनुदानीत युरिया खत शेतक-यांना न देता युरियाची बॅग बदलून औद्योगिक वापरासाठी विक्री करत असतांना हा छापा टाकण्यात आला आहे.नाशिक कृषि सहसंचालक विभागाच्या पथकातील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक अभिजीत गुमरे, जिल्हा गुणवत्ता निरिक्षक किरण विरकर, कृषि अधिकारी कारभारी नवले आदींनी या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली.

आरोपी फरार..पोलीसांचा तपास सुरु

छापा मारला त्यावेळी २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मालाच्या 'टेक्निकल ग्रेड युरिया फाॅर इंडस्ट्रि्अल युज ओन्ली' या नावाने भरलेल्या ५० किलोच्या १४३ गोण्या जप्त केल्या आहे.याप्रकरणी सागर कृषि सेवा केंद्राचे मालक मछिद्र शिंदे यांच्या विरुद्ध येवला तालूका पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, खत नियंत्रण आदेश १९८५ व भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी फरार असून अद्याप अटक केलेली नाही.पोलीस निरीक्षक अनिल भवारी तपास करत आहेत.

तब्बल २ लाखांचा मुद्देमाल जप्त

शेतकऱ्यांसाठी अनुदानावर दिले जाणारे युरीया खत औद्योगिक वापरासाठी काळाबाजाराने विक्री करतांना कृषी विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तालुक्यातील जळगाव नेऊर येथे एका प्रतिष्ठित विक्रेत्यांकडे खताच्या गोण्यांचा काळाबाजार उघड झाला असून २ लाख १४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com