महिला सरपंचपदाची आज आरक्षण सोडत; सोडतीकडे अनेकांचे लक्ष

gram panchayat elections.jpg
gram panchayat elections.jpg

नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या दौऱ्यामुळे पुढे ढकलण्यात आलेली महिला सरपंचपदाची जातप्रवर्गनिहाय आरक्षण सोडत शुक्रवारी (ता. ५) निघणार आहे. तहसील कार्यालयांत सकाळी दहाला, तर काही ठिकाणी दुपारी तीनला ही आरक्षण सोडत जाहीर होईल.

महिला सरपंचपदाची जातप्रवर्गनिहाय आरक्षण सोडत

गेल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून, जातप्रवर्गनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यात जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींपैकी ठरल्यानुसार ४२९ ग्रामपंचायती सर्वसाधारण गटासाठी, तर २१८ ग्रामपंचायतींची सरपंच पदे इतर मागास प्रवर्गांसाठी (ओबीसी) राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ५४ आणि अनुसूचित जमातींसाठी १०९ ग्रामपंचायतींची सरपंचपदे राखीव आहेत.

आरक्षणपद सोडतीकडे लक्ष

आता महिला सरपंच आरक्षणपद सोडतीकडे लक्ष लागले आहे. नाशिक, मालेगाव, सटाणा, चांदवड, कळवण, निफाड, इगतपुरी, येवला आणि दिंडोरी तालुक्यांतील आरक्षण सोडत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहाला, तर देवळा, सुरगाणा, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, नांदगाव आणि पेठ साठीची सोडत दुपारी तीनला निघणार आहे.  
हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com