kabristan 1.jpg
kabristan 1.jpg

नाशिकमध्ये कब्रस्तानासाठी जागा देण्याच्या वादावर अखेर पडदा; हिंदू संघटनांकडून महापालिकेचे आभार 

नाशिक : नाशिक अमरधाममागील नाथपंथीय, महानुभाव पंथीयांच्या जागेच्या बाजूला कब्रस्तानासाठी जागा देण्याचा ठराव रद्द केल्याने वादावर पडदा पडला आहे. दफनभूमीची जागा कब्रस्तानाला देण्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. 

कब्रस्तानासाठी जागा देण्याचा ठराव रद्द 
टाळकुटे पुलाच्या बाजूला हिंदू स्मशानभूमी असून, स्मशानभूमीच्या बाजूला गोसावी दशनाम, नवनाथपंथीय समाजाची दफनभूमी आहे. लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना या दफनभूमीच्या बाजूला कब्रस्तानासाठी जागा देण्याची मागणी नगरसेविका समिना मेमन यांनी पत्राद्वारे केली होती. सध्या कोरोनाची साथ असल्याने मृत शरीरे दफन करण्यासाठी जागा कमी पडत असल्याने स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी तात्पुरती मान्यता दिली होती. त्याला विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने तीव्र विरोध केला.

हिंदू संघटनांकडून महापालिकेचे आभार 

स्थायी समितीच्या निर्णयावर आक्षेप घेत हिंदू समाजाची जागा अन्य समाजाला देऊ नये, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त कैलास जाधव, स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्याकडे केली होती. कब्रस्तानाला जागा दिल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर निर्णय रद्द करण्यात आला. हिंदू संघटनांचे प्रतिनिधी नंदू कहार, कैलास देशमुख, विनोद थोरात, चंदन भास्करे, भालचंद्र कुलकर्णी, स्वप्नील मोहरील, हर्षल चव्हाण, प्रकाश बर्वे, रोहित कानडे, प्रवीण चव्हाण, विनोद धायडे यांनी सभापती गिते यांची भेट घेत आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com