भाविकांनी VIDEO मार्फत नजरेत साठवले आदिशक्तीचे चैतन्यदायी रूप! देवी सप्तशृंगीदेवीच्या ऑनलाइन दर्शनाला प्रतिसाद 

sapta shrungi.jpg
sapta shrungi.jpg

नाशिक / दहीवड : आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी निवासिनी देवीचा नवरात्रोत्सव म्हणजे नवं चैतन्याचा झरा. नवरात्रातील नऊ दिवसांतील देवीची विविध रुपे, फुलांनी सजलेले मंदिर, भाविकांच्या भक्तीने ओसंडून वाहणारा देवीचा दरबार या नवरात्रात मात्र कोरोनामुळे प्रथमच सुनासुना दिसला. पण भक्तीने भरलेल्या नजरेत देवीचे चैतन्यदायी रूप पाहता व साठवता नक्कीच येणार आहे.

भाविकांनी नजरेत साठवले देवीचे चैतन्यदायी रूप 

ट्रस्टच्या नियोजनानुसार देवीभक्तांसाठी नवरात्रोत्सवाचा संपूर्ण सोहळा ऑनलाइन करण्यात आला असून, लाइव्ह दर्शनाच्या माध्यमातून नित्यपूजा, आरती व इतर आनुषंगिक धार्मिक उपक्रम सगळे घरबसल्या पाहता येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगड येथील देवीचा नवरात्रोत्सव जिल्हा प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र डिजिटलच्या युगात आता लाखो भाविकांचा जिव्हाळा असणारा नवरात्रोत्सव सोहळा हा देखील कोरोनाच्या प्रादुर्भावाने ऑनलाइन झाला.

डिजिटलच्या युगात ऑनलाइन दर्शनाला प्रतिसाद

सध्या यूट्यूबच्या ऑनलाइन संकेतस्थळाच्या आधारे भाविक घरबसल्या देवीचे दर्शन घेत आहेत. सध्या ऑनलाइन दर्शनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. देवीच्या दर्शनाची आस बाळगून असलेल्या लाखो भक्तांच्या पदरी निराशा आली असली तरी ऑनलाइन दर्शनाच्या सुविधेने दूर होणार आहे. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टने लाइव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून जगभरातील देवीभक्त दर्शन घेऊ शकणार आहेत. यंदा प्रथमच नवरात्रोत्सवात नऊ दिवस मंदिर बंद असेल व लक्ष लक्ष श्रद्धाळूच्या पावलांना गडाची वाट बंद असणार आहे.

नागरिकांचा घरबसल्याच आरतीत सहभाग

नऊ दिवसांतील सगळे धार्मिक विधी परंपरेनुसार होतील आणि देवीभक्तांना घरबसल्या देवीचे दर्शनदेखील मिळाले. देवीच्या आरतीसाठी प्रत्यक्ष सभामंडपात गर्दी न करता नागरिकांनी घरबसल्याच आरतीत सहभाग घेतला आहे. यामुळे गर्दी टाळण्याचा शासकीय आदेश आणि त्यामागील उद्देश नक्कीच साध्य झाल्याचे चित्र आहे.  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com