जळगाव नेऊरच्या सेवानिवृत्त सुभेदारांचे जल्लोषात स्वागत; १९ वर्षे अविरत सेवा

बापूसाहेब वाघ
Friday, 16 October 2020

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनिअर युनिट मध्ये १९ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर सुभेदार आनंदा गुंड यांचे आपल्या परिवारासह जळगाव नेऊरला आले. यावेळी ग्रामस्थांतर्फे आपला गाव,आपला अभिमान बाळगत जल्लोषात गुंड परिवाराचे स्वागत केले

नाशिक/मुखेड : जळगाव नेऊर (ता.येवला) गावचे भूमिपुत्र सैन्यदलातील सुभेदार आनंदा गुंड भारतीय सैन्यदलात इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनिअर युनिट मध्ये १९ वर्षे सेवा करून सुभेदार पदावर कार्यरत असताना पंजाब येथे सेवानिवृत्त झाले. यानंतर जळगाव नेऊर गावात येताच ग्रामस्थांतर्फे त्यांचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी दिलेल्या या सत्कारामुळे ग्रामस्थांचे लष्कराप्रति असलेले प्रेम पुन्हा एकदा दिसून आले. 

जल्लोषात गुंड परिवाराचे स्वागत

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल इंजिनिअर युनिट मध्ये १९ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर सुभेदार आनंदा गुंड यांचे आपल्या परिवारासह जळगाव नेऊरला आले. यावेळी ग्रामस्थांतर्फे आपला गाव,आपला अभिमान बाळगत जल्लोषात गुंड परिवाराचे स्वागत केल त्यानंतर हनुमान मंदिर सभागृहात सेवानिवृत्त सुभेदार, आई, वडील, गुंड परिवार यांचा यथोचित सत्कार समस्त ग्रामस्थांच्या तर्फे करण्यात आला. जळगाव नेऊर येथील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्त्व असलेले आनंदा मोतीराम गुंड हे २००१ मध्ये सैन्यदलात दाखल झाल्यानंतर सैनिक ते सुभेदार पदापर्यंत वाटचाल वाखाणण्याजोगी आहे.देशसेवेबरोबर त्यांनी विविध खेळांमध्ये आपली चुणूक दाखवत बॉक्सिंग या खेळात सुवर्णपदक संपादन केले आहे. त्यांच्या चांगल्या सेवेमुळे दुसऱ्या देशामध्ये (भुटान) सेवा करण्याची संधी देखील त्यांना मिळालेली आहे. 

हेही वाचा >"कलेक्टरसाहेब, शहर-जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवा!" पोलिस आयुक्तांचे तिन्ही विभागांना पत्र

यावेळी आई गंगुबाई गुंड, वडील मोतीराम गुंड, भाऊ गणपत गुंड, चंद्रभान गुंड, प्रकाश वाघ, लक्ष्मण शिंदे, प्रकाश शिंदे, कोंडाजी शिंदे, नवनाथ शिंदे, संजय शिंदे, नारायण शिंदे, पांडुरंग म्हस्के, श्याम शिंदे, प्रमोद थोरात, शांताराम शिंदे, प्रभाकर शिंदे, अमोल जावळे, तौसिब शेख, गोरख शिंदे, सुनील मेथे, नितीन गुंड, पंकज गुंड, नारायण खोकले, दत्तात्रय शिंदे, महेश खोकले, गणेश खोकले, प्रवीण शिंदे, उमेश शिंदे, साहेबराव गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, शिवाजी गव्हाणे, रामदास गव्हाणे, दिगंबर गायकवाड, सुरेश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, भिवचंद राऊत, पांडुरंग वाघ, नंदु गव्हाणे, पापामिया शेख, शरद तिपायले, शरद सोनवणे, दत्तू तिपायले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

गावला सुभेदारांचा वारसा 

जळगाव नेऊर व परिसरातील अनेक तरुण भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत तर काही सेवानिवृत्त झाले आहे. सुभेदार या उच्च पदावर कै.सुभेदार बाळनाथ घुले यांच्यानंतर उच्च पदावर सुभेदारपदी विशाल वाघ यांची वर्णी लागली. त्यानंतर नववर्ष २०१९ च्याप्रारंभी गावासाठी व कुटुंबासाठी अभिमानाची बाब म्हणजे आनंदा गुंड यांचीही सुभेदार पदी नियुक्ती झाली होती. 

हेही वाचा > दुर्दैवी! अस्मानी संकट, निसर्गाचा कहर आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired Subhedar Ananda Gund was warmly welcomed in the village nashik marathi news