परतीच्या पावसाने द्राक्षबागांची दाणादाण; रोगांचा प्रादुर्भाव वाढला

grape crop nashik
grape crop nashik

नाशिक : (पिंपळगाव बसवंत, कसेब सुकेणे) परतीचा पाऊस छाटणी झालेल्या द्राक्षबागांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. पोगा अवस्थेतील द्राक्षघडांवर डावणी, करपा रोगांचे आक्रमण होण्याची चिन्हे आहेत. पाऊस होताच औषध फवारणी करावी लागत असल्याने खर्च थांबत नाही. 

निफाड तालुक्यात द्राक्ष छाटणीला वेग आला आहे. पण परतीचा पावसाचे संकट उभे ठाकले आहे. आतापर्यंत २५ हजार हेक्टरहून अधिक द्राक्षबागांची छाटणी झाली आहे. औषधे, खते असा हेक्टरी ४० हजार रुपयांपर्यत खर्च झालेला आहे. परतीच्या पावसाचा सुरू झालेला धुमाकूळ आठ दिवस होऊनही थांबलेला नाही. त्यामुळे द्राक्षांचे पीक हाती येईल का नाही, याची शाश्‍वती नाही. अस्मानी संकटाने शेतकरी बेजार झाले आहेत. द्राक्ष हंगामाच्या सुरवातीलाच समस्याचे शुक्लकाष्ट मागे लागल्याने शेतकऱ्यांच्या तोडचे पाणी पळाले आहे. दिवसरात्र औषध फवारणी करावी लागत आहे. 

सोने गहाण ठेवून केले भांडवल उभे 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या हंगामात हातातोंडाशी आलेला द्राक्षपिकाचा घास हिरावला गेला. भांडवल शिल्लक न राहिल्याने घरातील सोने गहाण ठेवून पैसे उपलब्ध केले. पण पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. छाटणी होऊन पंधरा दिवस झालेल्या द्राक्षबागा पोगा अवस्थेत आहेत. पावसामुळे डावणी, करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढून द्राक्षाचा दर्जा खालावणार आहे. 

कसबे सुकेणेत नुकसान 

कसबे सुकेणेसह मौजे सुकेणे व परिसरात रविवारी (ता. १८) दुपारी तीनला परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. ऑक्टोबर महिन्यात द्राक्षबागेची छाटणी जोरात सुरू असून, सप्टेंबर महिन्यात छाटलेल्या द्राक्षबागा पहिल्या डिपिंगपर्यंत आलेल्या आहे, तर छाटलेल्या द्राक्षबागा पोगा अवस्थेत असल्याने पोंग्यामध्ये पाणी साचून डावनी रोगाचा प्रादुर्भाव वाढून पावसाने घड जिरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले जाण्याची शक्यता असल्याने द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले आहे. द्राक्षांसह सोयाबीन सोंगणी व माळनीचे काम सुरू असून, पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पावसामुळे टोमॅटो फुलकळी नष्ट होत आहे. 


यंदा द्राक्षबागेतून घडी सावरेल अशी अपेक्षा आहे. पण परतीच्या पावसाने द्राक्ष हंगामाच्या प्रारंभीच दुष्ट लावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 
-प्रमोद बोरस्ते, द्राक्ष उत्पादक, साकोरे मिग 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com