पर्समध्ये रोकड असल्याचे वाहतूक पोलीसाच्या लक्षात आले..अन् मग...

traffic police return purse.jpg
traffic police return purse.jpg

नाशिक : एका सफाई कामगार महिलेस वाहतूक पोलिसांच्या प्रामाणिकपणाचा अनुभव आला. खासगी रुग्णालयात उपचारासाठी काढलेले 14 हजार रुपये आणि मोबाईलसह रिक्षातून उतरताना पडलेली पर्स वाहतूक पोलिसांनी परत केली. 

असा घडला प्रकार..

वाहतूक शाखेचे हवालदार द्वारकासिंग यादव, पोलिस नाईक अशोक उगले असे प्रामाणिक पोलिसांचे नाव आहे. उषा रेवर (वय 44, रा. रेडक्रॉस सोसायटीसमोर) सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मंगळवारी (ता. 27) सायंकाळी सहाच्या सुमारास सह्याद्री हॉस्पिटल येथून रिक्षाने शालिमार चौकात आल्या. रिक्षातून घाईघाईने उतरून त्या रेडक्रॉस सिग्नलच्या दिशेने निघून गेल्या. परंतु त्या घाईगडबडीत शालिमार चौकात रिक्षातून प्रवासी उतरतात त्या ठिकाणी त्यांची पर्स पडली. पर्स पडल्याचे त्यांच्या लक्षात आलेच नाही. शालिमार चौकात वाहतूक शाखेचे हवालदार द्वारकासिंग यादव, अशोक उगले बेशिस्त रिक्षांविरोधात कारवाई करीत होते. अशोक उगले यांना काहीतरी वाजत असल्याचा आवाज आला. त्या वेळी त्यांना जवळच एक पर्स पडलेली दिसली. त्यांनी पर्स उचलली आणि उघडली असता त्यात मोबाईल सायलंट मोडवर असल्याने वाजत होता. पर्समध्ये 14 हजार रुपयांचीही रोकड होती. त्यांनी हवालदार द्वारकासिंग यादव यांच्या निदर्शनास आणून दिले.

प्रामाणिकपणाबद्दल कौतुक 

मोबाईलवरून करण्यात आलेल्या शेवटच्या कॉलवर अशोक उगले यांनी त्याच मोबाईलवरून कॉल केला असता, समोरून बोलणारी महिला ज्यांची पर्स होती त्यांची बहीण होती. उगले यांनी पर्स, त्यातील मोबाईल आणि रोकड पोलिसांकडे असून, त्यांना शालिमार चौकात बोलाविण्याचा निरोप दिला. त्यानुसार, उषा रेवर या बहिणीसह शालिमार चौकात आल्या. पोलिसांनी त्यांना वाहतूक शाखेत सहाय्यक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी यांच्याकडे नेले. त्या ठिकाणी सोपस्कार पार पाडल्यानंतर त्यांची पर्स मोबाईल व रोकडसह परत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. पोलिसांच्या प्रामाणिकपणाचे आभार मानले. त्या वेळी त्या भारावून गेल्या होत्या. 



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com