सावधान! हा रस्ता बनतोय "मौत का कुआँ'.. प्रवासी सुखरूप घरी येईल याची खात्री नाही...

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 27 May 2020

या रस्त्यावरून प्रवास करणारा प्रवासी सुखरूप घरी येईल, याची खात्री नाही. लहान-मोठी वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.अनेक वाहनचालकांना पाठीचे, तर काहींना मणक्‍यांचे आजार जडल्याने परिसरातील जनतेकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नाशिक : या रस्त्यावरून प्रवास करणारा प्रवासी सुखरूप घरी येईल, याची खात्री नाही. कारण रस्त्यावर ठिकठिकाणी अर्ध्या फुटाचे खड्डे पडले असून, लहान-मोठी वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नांत रोजच अपघात घडत तर आहेच; पण अनेक वाहनचालकांना पाठीचे, तर काहींना मणक्‍यांचे आजार जडल्याने परिसरातील जनतेकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Image may contain: sky, outdoor and nature

नांदूरमध्यमेश्‍वर ते शिवरे फाटा रस्ता बनतोय धोकादायक

सात ते आठ वर्षांपासून नांदूरमध्यमेश्‍वर ते शिवरे फाटा रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. सुरत, वघई, पिंपळगाव, शिवरे फाटा, सिन्नर या राज्यमार्ग 23 चे काम पिंपळगावपासून निफाडपर्यंत पूर्ण झाले. तर सिन्नरपासून खानगावथडीपर्यंत काम सुरू असून प्रगतिपथावर आहे. मात्र, नांदूरमध्यमेश्‍वर ते शिवरे फाटापर्यंतच्या कामास सुरवात झाली नाही. त्यात पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाढते खड्डे आणि पावसाळ्यात खड्ड्यांत साचणारे पाणी यामुळे अपघाताला आयतेच कारण मिळणार आहे. त्यातही शिवरे फाटा ते दिंडोरी तासपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेली शेकडो मोठी झाडे तोडली आहेत.

हेही वाचा > नाशिक ग्रामीण पोलीस दलातील तिसरा कोरोनाचा बळी..इथेही मालेगाव कनेक्शन

झाडांचे बुंधे अन्‌ काही मोठी झाडे आजही रस्त्याच्या कडेला उभी आहेत. याबाबत मोठे गौडबंगाल झाल्याचे बोलले जात आहे. रस्त्यालगतच्या झाडांची रस्ता रुंदीकरणाला अडचण येत नसताना झाडे तोडून रस्ता बोडखा केल्याचा आरोप परिसरातील जनतेकडून होत आहे. 

हेही वाचा >  अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The road from Nandurmadhyameshwar to Shivare Fata is becoming dangerous nashik marathi news