भल्या पहाटेचा थरार! पिंपळगावला तब्बल चार सराफी दुकानांवर दरोडा; घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद 

pimplegaon theft 1.jpg
pimplegaon theft 1.jpg

पिंपळगाव बसवंत(जि.नाशिक)  : घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तीन ते चार दरोडेखोर तोडाला मास्क लावून आल्याचे स्पष्ट दिसत आहे. हिंदीत संभाषण करीत असल्याचे पोलिस तपासात दिसले.

घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद
पिंपळगाव शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या मेन रोडवर शुक्रवारी पहाटे साडेतीनला इको इटोसमधून चौघे दरोडेखोर बाजारपेठेत आले. जुना आग्रा रोडवरील सह्याद्री संकुलातील अथर्व खरोटे यांच्या अलंकार ज्वेलर्सचे शटर लोखंडी हत्याराने तोडून ४५ हजारांचे मंगळसूत्र, गंठण तर, दहा हजारांची रोकड लांबविली. दरोडेखोरांनी मेन रोडवरील विलास बिरारी यांच्या बिरारी ज्वेलर्सकडे मोर्चा वळविला. तेथून चार लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने, तर दोन हजार ९०० ग्रॅम चांदीचे दागिने लांबविले. लगतच्या भगवान राठी यांच्या ‘न्यू राम ज्वेलर्स’चे शटर तोडून दोन लाख ७५ हजारांचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. सुमारे सात लाखांचे दागिने, रोकड घेऊन दरोडेखोर पसार झाले. सकाळी लगतचे व्यावसायिक दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर ही घटना उघड झाली. यात तब्बल सात लाखांचे दागिने व रोकड लंपास केली.

गुंडाची धरपकड करून कसून चौकशी

दरोडा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तीन ते चार दरोडेखोर तोडाला मास्क लावून आल्याचे स्पष्ट दिसत आहे. हिंदीत संभाषण करीत असल्याचे पोलिस तपासात दिसले. दरोडेखोर निफाड, मालेगाव, गुजरातकडे पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस रवाना झाले. पिंपळगाव शहरातील कुख्यात गुंडाची धरपकड करून कसून चौकशी सुरू झाली आहे. पिंपळगाव ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाकडून उभारलेले चौकात सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीअभावी धूळखात पडून आहेत. ते सुरू असते तर दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात मदत झाली असती. आमदार दिलीप बनकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पिंपळगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक भाऊसाहेब पटारे, अजय कवडे तपास करीत आहे.  

पिंपळगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान

पिंपळगावला निफाड फाट्यालगत भरवस्तीतील चार सराफी दुकानांवर शुक्रवारी (ता. ८) पहाटे दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या चोरीचा घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला असून, पिंपळगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com