थरारक! बिअर बारचा मॅनेजर रक्ताच्या थारोळ्यात...अन् ते फ्रीजमधील थंडगार बिअरचा घेत होते आस्वाद

alcholol.jpg
alcholol.jpg

नाशिक / वावी : हॉटेलमधील कुकर आणि मिक्‍सर बाहेर फेकला. हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या वाहनामध्ये माल ठेवला, त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेल्या थंडगार बिअरच्या बाटल्यांचा त्यांनी आस्वाद घेतला. जाताना मॅनेजरचे मनगटी घड्याळ व मोबाईल फोन आणि बाहेर उभी होंडा कंपनीची दुचाकी घेऊन ते पसार झाले. पण त्यापूर्वी जे घडले ते धक्कादायक होते

असा घडला प्रकार

दिलीप कपोते यांच्या मालकीच्या बिअर बार परमिट रूमचे व्यवस्थापक माधव विठ्ठल हारक नेहमीप्रमाणे हॉटेलमागच्या खोलीत झोपले असताना दीडच्या सुमारास काळे कपडे परिधान केलेल्या व तोंड झाकलेल्या चार अनोळखी तरुणांनी खोलीच्या दुसऱ्या बाजूचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. हारक यांना जाग येण्यापूर्वीच या चौघांनी त्यांच्या डोक्‍यात काठीने प्रहार करून रक्तबंबाळ केले. त्याच अवस्थेत त्यांची उचलबांगडी करून शेजारच्या खोलीत आणले. तेथेही मानेला सुरा लावून मारहाण केली. त्यांच्याकडून हॉटेलच्या चाव्या जबरदस्तीने हिसकावून घेत जवळच्या रकमेची मागणी केली. जिवाच्या भीतीने हारक यांनी जवळ असलेला हॉटेलचा 20 हजार रुपयांचा गल्ला चोरट्यांच्या स्वाधीन केला. हारक यांनी आरडाओरड करू नये म्हणून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून व हातपाय बांधून चोरटे कुलूप उघडून हॉटेलमध्ये शिरले. येथे लाइट सुरू करून आतमध्ये उचकापाचक केली. या वेळी स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या मद्याचा साठा चोरट्यांच्या हाती लागला. 

आपले हातपाय कसेबसे सोडवून त्यांनी पोलिस ठाणे गाठले.
विदेशी मद्याचे चार बॉक्‍स व बिअरचा एक बॉक्‍स मिळून 28 हजार रुपयांचे मद्य चोरट्यांनी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या वाहनाकडे नेले, तर फ्रीजमध्ये ठेवलेल्या थंडगार बिअरच्या बाटल्यांचा त्यांनी आस्वाद घेतला. जाताना हारक यांचे मनगटी घड्याळ व मोबाईल फोन आणि बाहेर उभी होंडा कंपनीची दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले. हॉटेलमधील कुकर आणि मिक्‍सर बाहेर फेकला. त्यानंतर अडीचच्या सुमारास आपले हातपाय कसेबसे सोडवून हारक यांनी पोलिस ठाणे गाठले. कपोते यांना पोलिसांनी घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, हवालदार प्रवीण अडांगळे, उमेश खेडकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सकाळी ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. 

चाकूचा धाक दाखवत मारहाण

गावाजवळच्या एका बिअर बार परमिट रूमच्या व्यवस्थापकाला चाकूचा धाक दाखवत चौघांनी मारहाण करीत 20 हजार रुपयांची रोकड, 28 हजार रुपयांचा मद्याचा साठा व दुचाकी लांबविल्याची घटना मध्यरात्री घडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com