ब्रेकिंग : युको बँकेत चोरी; सीसीटीव्‍ही नियंत्रण कक्षाची तोडफोड.. काय घडला नेमका प्रकार..

uco bank
uco bank

नाशिक : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्‍या रविवार कारंजा परीसरात असलेल्‍या युको बँकेत चोरीची घटना उघडकीस आली आहे. गेली दोन दिवस शनिवार आणि रविवार बँकेला सुट्टी असल्‍याने, संधी साधत चोरट्यांनी बँकेच्‍या मागील बाजूला असलेल्‍या भिंतीला भगदाड पाडून बँकेत प्रवेश केल्‍याचे निदर्शनास आले आहे. नियमित कामकाजासाठी अधिकारी-कर्मचारी बँकेत दाखल झाल्‍यानंतर हा प्रकार लक्षात आला. दरम्‍यान बँकेतील किती रक्‍कम चोरीस गेला त्‍याबाबत तपास केला जात असून, वरीष्ठ पोलिस अधिकार्यांसह डॉग स्‍कॉड घटनास्‍थळी दाखल झाले आहे. 

बँकेमागील भिंतीला भगदाड पाडले

यासंदर्भातील अधिक माहिती अशी, नेहमी वरदळ असलेल्‍या रविवार कारंजा परीसरातील युको बँक असून, परीसरातील व्‍यावसायिकांसह नागरीकांचेही खाते या बँकेत आहेत. शनिवार व रविवार असे दोन दिवस बँकेला सुट्टी होती. सोमवारी नियमित वेळेत बँकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्‍थित झाल्‍यानंतर बँकेत आत प्रवेश करताच सर्व साहित्‍य अस्‍तव्‍यस्‍त पडलेले असल्‍याचे आढळून आले. पोलिसांना घटनेची माहिती देत पाचारण करण्यात आले. यात काही प्राथमिक माहिती पुढे आली आहे. बँकेत घुसण्यासाठी चोरट्यांनी बँकेमागील भिंतीला भगदाड पाडले. तसेच आत शिरल्‍यानंतर चोरट्यांनी बँकेत असलेले साहित्‍य अस्‍तव्‍यस्‍त करत फेकले. तसेच सीसीटीव्‍ही नियंत्रण कक्षाची तोडफोड करतांना सीसीटीव्‍ही कॅमेरेदेखील फोडण्याचा प्रयत्‍न केला. या घटनेची माहिती मिळताच, पोलिस उपायुक्‍त अमोल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्‍त मंगलसिंग सुर्यवंशी यांच्‍यासह गुन्‍हेशोध पथकाचे अधिकारी, डॉगस्‍कॉड घटनास्‍थळी दाखल झाले आहे.

रक्‍कमेचा अंदाज अद्याप नाही
याप्रकरणी घरफोडीचा गुन्‍हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्‍यान चोरट्यांनी नेमकी किती रक्‍कम लांबविली याची मोजदाद बँक यंत्रणा व पोलिसांकडून सुरू होती. पुढील तपासात याबद्दलचा सविस्‍तर तपशील मिळू शकेल, असे सांगण्यात आले आहे.

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com