‘मिशन बिगीन अगेन’ मागची भुमिका तळागाळात पोहचवावी लागेल - भुजबळ

bhuj meeting.jpg
bhuj meeting.jpg

नाशिक : जग, राज्य आणि त्यापाठोपाठ जिल्हा आणि प्रत्येक गावाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे, सर्वत्र नागरिकांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी नात्याने आपल्या सर्वांची आहे. तसेच ‘मिशन बिगेन अगेन’ मागची शासनाची भुमिका तळागाळात पोहचवावी लागेल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज (ता.११) शासकीय विश्राम गृह नाशिक येथे महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते.


नागरिकांच्या हाताला काम मिळण्याची गरज
यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ म्हणाले, आपली अर्थव्यवस्था अत्यंत नाजुक परिस्थितीतून जात असून दिवसेंदिवस उपजीविकेचा प्रश्न गंभीर होताना दिसत आहे. केवळ अन्नधान्य पुरवठा करून पुरेसे होणार नाही. नागरिकांच्या हाताला काम मिळण्याची गरज आहे. त्यामुळे ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्यासाठी सर्वांना उपाययोजनांसोबत त्यांच्या अंमलबजावणीसाठी निरंतर सक्रिय रहावे लागेल. कोरोनाशी लढताना केंद्र सरकार आणि राज्य शासनाकडून आलेल्या गाईड लाईन्स पाळण्याची आवश्यकता आहे. खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांनी या काळात नागरिकांना समजून सांगून परिस्थिती नियंत्रणात कशी राहील याची काळजी घ्यावी, असे मंत्री भुजबळ यांनी यावेळी बोलताना सांगितले.

लवकरच आपण नियंत्रण मिळवू शकणार

सायंकाळी ७ ते पहाटे पाच वाजेपर्यंत लॉकडाऊन कडक करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. रूग्णांचे तपासणी संख्या वाढविल्याने रुग्णांची संख्या वाढणार आहे, मात्र त्यामुळे लवकरच यावर आपण नियंत्रण मिळवू शकणार आहोत.जिल्हा रुग्णालयात लवकरच टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येत आहे. रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत अतिरिक्त बेडची व्यवस्थेचे नियोजन करण्यात आल्याचे यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

बैठकीत पदाधिकारी

यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकर, सुहास कांदे, सरोज आहिरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, शिरीष कोतवाल, दीपिका चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, सुनील पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, सिमंतिनी कोकाटे, राजाराम पानगव्हाणे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com