VIDEO : नाथांच्या दारी वारकऱ्यांची मांदियाळी! भाविक त्र्यंबक नगरीत!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 January 2020

निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त येथे समाधी मंदिरात प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. भाविकांना सुलभतेने चालता येईल व आपत्तीकाळात व्यवस्था पुरविता येईल, याची दक्षता घेऊन यात्रेचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रशासनाला दिल्या

नाशिक : संत निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या पालख्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत. माऊलीचा गजर करत वारकरी त्र्यंबक नगरीत दाखल होत असताना शहर परिसर भगवे ध्वज, टाळ मृदंग यामुळे भक्तीमय झाले आहे. यंदा नाशिकमध्ये कडाक्याची थंडी असूनही अनेक वारकरी दर्शनासाठी दाखल होत आहेत. सगळीकडे हरिनामाचा गजर सुरू असल्यामुळे त्र्यंबकेश्वरात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे.

(फोटोज आणि व्हिडीओ - सोमनाथ कोकरे / आनंद बोरा)

यात्रेतून शिस्तबद्धतेचं दर्शन! 

निवृत्तिनाथांची यात्रा म्हणजे वारकऱ्यांसाठी मोठा सोहळा अन् त्याहून एक पर्वणीच... त्र्यंबकेश्वर येथे मानकरी असलेले जुने फड आणि दिंड्या दाखल झाल्या आहेत. महाराजांचा यात्रोत्सव हा शिस्तबद्ध यात्रोत्सवच म्हणावा लागेल. वारकरी अत्यंत शिस्तबद्धपणे नाशिक-त्र्यंबक रस्त्यापासून ते थेट मंदिरापर्यंत दाखल होत आहेत. स्वत:चे पहारेकरी, स्वयंपाकाची साधने असे सर्व नियोजन असून त्यातून शिस्तीचा अन् स्वयंसेवेचे दर्शन देखील घडत आहे. 

जय्यत तयारी...चोख नियोजनाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्त येथे समाधी मंदिरात प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. भाविकांना सुलभतेने चालता येईल व आपत्तीकाळात व्यवस्था पुरविता येईल, याची दक्षता घेऊन यात्रेचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रशासनाला दिल्या. यात्रेनिमित्त समाधी परिसरात भाविकांना दर्शन घेणे सोपे जावे म्हणून दर्शन बारीसाठी बांबूचे कठडे उभारण्यात आले आहेत. दिंड्या मुक्कामाच्या ठिकाणावर पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसह तात्पुरता वीजपुरवठा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Image may contain: 3 people, fire and outdoor

यात्रोत्सवात रहाट, पाळणे आदींसह येणाऱ्या वाहनांना पार्किंगसाठी तर तमाशा मंडळांना जव्हार चौफुलीकडे जागा देण्यात आली आहे. गर्दीच्या पार्श्‍वभमीवर राज्य परिवहन महामंडळाने जादा बस तैनात केल्या असून, बसस्टॅंड गजानन संस्थानासमोर हलविण्यात आला आहे. 

Image may contain: 2 people, people standing, child and outdoor

ध्वनिक्षेपण यंत्रणा पुन्हा कार्यान्वित

निर्मलवारीसाठी शौचालये गर्दीच्या ठिकाणी उभारण्यात आली आहेत. कुंभमेळ्याच्या कालावधीत असणारी ध्वनिक्षेपण यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी जादा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तीन दिवसांच्या यात्रेसाठी पालिका नेहमीप्रमाणे सर्व व्यवस्था बघत आहे.

Image may contain: 2 people, hat, outdoor and closeup

सोमवारी एकादशीच्या दिवशी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते महापूजा होईल. प्रथेप्रमाणे दुपारी नाथांचा रथ त्र्यंबकेश्‍वर मंदिरात दर्शनार्थ येईल. यात्रेत निवृत्तिनाथ मंदिरासह दिंड्यांच्या फडावर नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांचे कार्यक्रम होणार आहेत.

Image may contain: 1 person, outdoor and nature

Image may contain: 2 people, tree, shoes and outdoor

क्लिक करा > भरारी पथकाला खबर होतीच....पिक-अप वाहनाची झडती घेतली असता 'हे' काय निघाले?

Image may contain: 4 people, people on stage, wedding, sky and outdoor

क्लिक करा > धक्कादायक! नशेत सैन्यदलाच्या जवानाकडून 'हे' काय घडले?

Image may contain: 5 people, people standing and outdoor

क्लिक करा > PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....

Image may contain: one or more people, sky, tree and outdoor

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saint Nivruttinath yatra starts from trimbkeshwar Nashik Marathi News