VIDEO : अभूतपूर्व! गळा तुळशीमाळ..मुखी विठुमाऊली..विलोभनीय..

केशव मते : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 20 जानेवारी 2020

वारीच्या परंपरेचा वसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविणारे शेकडो वारकरी लेकरांना खांद्यावर बसवून रिंगण सोहळ्याचे दृश्‍य डोळ्यात साठवून घेण्यासाठी जमले होते. महाराष्ट्रातील महिरावणीनजीक विसावणाऱ्या बहुतांश महत्त्वाच्या मानाच्या दिंड्यांसह राज्यभरातील 475 दिंड्या रविवारी (ता.18) सायंकाळी त्र्यंबकराजाच्या नगरीत दाखल झाल्या. 

नाशिक : गळ्यात तुळशीची माळ, डोक्‍यावर तुळस, कपाळावर टिळा, खांद्यावर भगवा ध्वज आणि मुखी विठुमाउलीचे नाव घेत दूरदूरहून आलेल्या वारकऱ्यांच्या रिंगण सोहळ्याने महिरावणीचा परिसर रविवारी (ता.19) फुलून गेला होता. रिंगण सोहळ्याचे विलोभनीय दृश्‍य डोळ्यात साठवून घेण्यासाठी आबालवृद्धांसह कष्टकरी महिला मोठ्या संख्येने दिंड्यात सहभागी झाल्या आहेत. वारीच्या परंपरेचा वसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविणारे शेकडो वारकरी लेकरांना खांद्यावर बसवून रिंगण सोहळ्याचे दृश्‍य डोळ्यात साठवून घेण्यासाठी जमले होते. महाराष्ट्रातील महिरावणीनजीक विसावणाऱ्या बहुतांश महत्त्वाच्या मानाच्या दिंड्यांसह राज्यभरातील 475 दिंड्या रविवारी (ता.18) सायंकाळी त्र्यंबकराजाच्या नगरीत दाखल झाल्या. 

Image may contain: sky and outdoor

त्र्यंबकेश्‍वरला राज्यभरातील 475 दिंड्या दाखल 

यात्रोत्सवाच्या विसाव्याला निघताना आदल्या दिवशी सकाळी महिरावणीला सकाळी रिंगण धरले जाते. आनंद ओसांडून वाहणाऱ्या या रिंगणात दूरदूरचे वारकरी माउली परस्परांना भेटून कुशल मंगल विचारतात. ब्रह्मा व्हॅलीच्या मैदानावर रविवारी 69 वर्षांची परंपरा असलेल्या कृष्णाजी माउली श्रीक्षेत्र जायखेडा यांचा भव्य गोल रिंगण सोहळा झाला. अकराशे वारकऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने दिमाखदार रिंगण सोहळा सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. वारकरी गणवेशातील कृष्णाजी माउलींच्या दिंडीने राज्यातील नावलौकिक मिळवला आहे. माउलींच्या दिंडीत जयरामजी बाबा, आचार्य हरिभाऊ, विश्‍वनाथ महाराज, विणेकरी जिभाऊ नानांसह 70 ते 80 टाळकरी व वादक सहभागी झाले होते. 

आखाड्यांनी उभारले पांढरे निशाण 
यात्रेकरूंच्या स्वागतासाठी त्र्यंबकेश्‍वरला जय्यत तयारी आहे. दोन दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्यात आले. त्यामुळे यंदा अतिक्रमणविरहित यात्रोत्सव होत आहे. भाविकांच्या स्वच्छतेसाठी यंदा प्रथमच त्र्यंबकेश्‍वरच्या नागरिकांनी त्यांची खासगी वैयक्तिक शौचालये भाविकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. त्यात त्र्यंबकेश्‍वरच्या पारंपरिक विविध आखाड्यांचे योगदान मोठे आहे. आखाड्यांनी त्यांचे स्वतःचे शौचालय वारकऱ्यांना वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी शौचालयाची सुविधा असलेल्या भागात पांढरे ध्वज उभारले आहेत. याशिवाय दर वर्षीप्रमाणे यंदा 850 सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच प्रशासन यंदा शौचालयांच्या संख्येनुसार नव्हे, तर त्यातील वीज, पाणी, स्वच्छता अशा सेवांवर आधारीत बिल काढणार असल्याने आरोग्यविषयक वातावरण टिकून राहणार आहे. 

Image may contain: 2 people, crowd

Image may contain: 1 person, standing and outdoor

Image may contain: one or more people, crowd and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saint Nivruttinath yatra at Trimbkeshwar Nashik Marathi News