धक्कादायक! हाॅटेलच्या आडोशालाच होत होता गैरप्रकार'..पोलीसांनाही धक्का

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 3 May 2020

वडगाव येथील कुसूंबा रस्त्यावरील हाॅटेल मोसम पार्कच्या आडोशाला एक व्यक्ती विनापरवाना गैरप्रकार करीत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीसांचे पथक वडगावकडे रवाना झाले व गुप्त माहिती देणा-याच्या माहितीनुसार हाॅटेल मोसम पार्कला चारही पोलिसांनी घेराव घातला. यात हाॅटेलच्या आडोशाला एक व्यक्ती विनापरवाना गैरप्रकार करीत असल्याचे निदर्शनास आले..अन् मग...

नाशिक / अंबासन : मालेगाव तालुक्यातील वडगाव येथील कुसूंबा रस्त्यावरील हाॅटेल मोसम पार्कच्या आडोशाला एक व्यक्ती विनापरवाना गैरप्रकार करीत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीसांचे पथक वडगावकडे रवाना झाले व गुप्त माहिती देणा-याच्या माहितीनुसार हाॅटेल मोसम पार्कला चारही पोलिसांनी घेराव घातला. यात हाॅटेलच्या आडोशाला एक व्यक्ती विनापरवाना गैरप्रकार करीत असल्याचे निदर्शनास आले..अन् मग...

असा घडला प्रकार

देशात व राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमी लाॅकडाऊन लागू असतांना काही ठिकाणी छुप्या पद्धतीने मद्य विक्रीचा सपाटा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. वडणेर खाकुर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव येथील कुसूंबा रस्त्यावरील हाॅटेल मोसम पार्कच्या आडोशाला एक व्यक्ती विनापरवाना विदेशी मद्याची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना मिळाली होती. त्यांनी वरीष्ठ आधिका-यांशी याबाबत वार्तालाप करीत उपनिरीक्षक विशाल पाटिल, हवालदार सुभाष निकम, राजू पगारे, काशी देवरे, मनिषा नवले यांच्यासह पथक वडगावकडे रवाना झाले व गुप्त माहिती देणा-याच्या माहितीनुसार हाॅटेल मोसम पार्कला चारही पोलिसांनी घेराव घातला. यात हाॅटेलच्या आडोशाला एक व्यक्ती विनापरवाना देशी दारू विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले.

Image may contain: 5 people, people standing, tree and outdoor

९७ हजार अकरा रुपयांचा मुद्देमाल ताब्यात

पोलिसांनी अचानकपणे छापा टाकून संबधित संशयितांस ताब्यात घेऊन नाव विचारले असता किशोर सुभाष माळी, (रा. माळीनगर, संगमेश्वर ता. मालेगाव) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याजवळ असलेला विदेशी मद्य व एक दुचाकी असा ९७ हजार अकरा रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सुभाष माळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.  

हेही वाचा > लॉकडाउनमध्ये हरविले सासरे...जावयाला बघून आनंदाश्रू अन् हुंदके ही...मन हेलावून टाकणारी घटना

पोलीसांनी केले आवाहन
वडणेर खाकुर्डी पोलिस हद्दीत कुठेही विनापरवाना गावठी, देशी व विदेशी मद्य विक्री केली जात असेल तर त्वरित पोलिस ठाण्यात माहिती द्यावी, माहिती देणा-यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

हेही वाचा > कोरोनाची धडक थेट शेतकऱ्याच्या बांधावरच!...चांदवडला पुन्हा एक पॉझिटिव्ह

   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sale of unlicensed foreign liquor at vadner nashik marathi news