रायगडावरील "वाघ्या'ची समाधी काढणारे 'ते' कार्यकर्ते निर्दोष 

raigad 1.jpg
raigad 1.jpg

नाशिक : रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरच्या चौथऱ्यावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटविल्याच्या प्रकरणात न्यायालयाने तब्बल आठ वर्षांनंतर संभाजी ब्रिगेडच्या 74 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. संबंधित कार्यकर्त्यांनी याप्रकरणी 22 दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. गेल्या फेब्रुवारीपासून माणगाव जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. दरम्यान, या 74 कार्यकर्त्यांमध्ये नाशिकच्या 56 युवकांचा समावेश आहे.

असा आरोप ब्रिगेडने केला होता.... 

1927 मध्ये किल्ले रायगड येथे छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला. त्यानंतर जवळपास दहा-12 वर्षांनी, म्हणजेच 1936 मध्ये राम गणेश गडकरींच्या राजसंन्यास नाटकाचा संदर्भ घेऊन शिवरायांच्या समाधीच्या मागील बाजूस दगडी चौथऱ्यावर वाघ्या कुत्र्याचे शिल्प उभारून, गडकरींच्या नाटकातीलच काही ओळींचा शिलाफलकही बसविण्यात आला. या प्रकारामागे तत्कालीन रायगड स्मारक समितीतील लोक असल्याचा आरोप ब्रिगेडने केला होता. 

74 कार्यकर्त्यांमध्ये नाशिकच्या 56 युवकांचा समावेश

दरम्यान, 1 ऑगस्ट 2012 ला संभाजी ब्रिगेडच्या 74 कार्यकर्त्यांनी हे शिल्प काढून फेकून दिले. यात नाशिकचे माजी नगरसेवक शिवाजी भागवत, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव नितीन रोठे पाटील, शरद लभडे, दर्शन बोरस्ते, विकी गायधनी, बापू मुरकुटे, सचिन घोलप, किरण देवरे, राजेश गज्जर, गणेश वाडेकर, सुनील शेवाळे, रवी दातार, ऋषी शिंदे, राजू दवंड, धनंजय घोरपडे, महेश चव्हाण, मोहन पाळदे, कमलाकर ताटे, जोतिबा गुंड आदी 56 जणांचा समावेश होता. या सर्व कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com