नाशिकच्या भूमीत 'या' प्रकल्पामुळे अवतरला स्वर्ग - खा. संभाजीराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

नाशिकची ओळख रंगीबेरंगी फुलांचे शहर म्हणून होती. त्यामुळेच नाशिकला गुलशनाबाद हे नाव पडले होते. आता तिच ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी नाशिकचे उद्योगपती व निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दुबईतील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर नाशिकमध्ये देशातील पहिले हजारो फुलांचे गार्डन प्रकल्प साकारले असल्याने शहराच्या लौकिकात भर पडल्याचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितले. 

नाशिक : नाशिकची ओळख रंगीबेरंगी फुलांचे शहर म्हणून होती. त्यामुळेच नाशिकला गुलशनाबाद हे नाव पडले होते. आता तिच ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी नाशिकचे उद्योगपती व निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दुबईतील मिरॅकल गार्डनच्या धर्तीवर नाशिकमध्ये देशातील पहिले हजारो फुलांचे गार्डन प्रकल्प साकारले असल्याने शहराच्या लौकिकात भर पडल्याचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितले. 

नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा 

खासदार भोसले यांच्या हस्ते बुधवारी (ता. 1) प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले. यावेळी नाशिकच्या भूमीत या प्रकल्पामुळे स्वर्ग अवतरला असून, जाधव पॅरेडाइजच्या रूपाने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निमाचे सेक्रेटरी तुषार चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते रंजन ठाकरे, छावाचे करण गायकर, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संजय महाजन, प्रकल्पाचे संचालक व निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, निर्मला जाधव, स्नेहकीता जाधव, शंतनू जाधव, शुभम जाधव, गोकुळ पाटील उपस्थित होते. सुमारे आठ एकर जागेत हा प्रकल्प साकारला आहे. यामध्ये शेकडो जातींचे रंगीबेरंगी फुलं याच ठिकाणी तयार केले आहेत. सुमारे दीड लाख कुंड्यांमध्ये विविध प्रतिकृती व आकारात सजावट केली आहे. शंभरहून अधिक सेल्फी पॉइंट आहे. सातपूरपासून त्र्यंबककडे जाताना 13 किलोमीटर अंतरावर जाधव वॉटर पार्कच्या प्रांगणातच हा प्रकल्प साकारला आहे. 

हेही वाचा > रात्रीचा 'तिचा' प्रवास...उद्यानात दारूच्या पार्ट्या रंगताना 'ते' तिला बघतात..अन् मग...

हेही वाचा > शौचालयाकडून दोघी घराकडे जाताना...'त्याने' दोघींचा रस्ता अडवला...कोणी आजूबाजूस नसताना...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji raje Bhosale statement flower park project at nashik Marathi News