महापालिकेचा निष्कर्ष...'क्षयरोगा'सारख्याच लक्षणाने कोरोना संशयितांचा आकडा वाढला!

विक्रांत मते
रविवार, 2 ऑगस्ट 2020

कोरोना संशयितांमध्ये क्षयरोग असलेल्या रुग्णांचाही समावेश केला जात असल्याने शहरात संशयितांचा आकडा सातत्याने वाढत असल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या पाहणीतून समोर आला आहे. 

नाशिक : सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे असलेल्या रुग्णांना कोरोना संशयित म्हणून दाखल करून घेतले जात आहेत. कोरोना संशयितांमध्ये क्षयरोग असलेल्या रुग्णांचाही समावेश केला जात असल्याने शहरात संशयितांचा आकडा सातत्याने वाढत असल्याचा निष्कर्ष महापालिकेच्या पाहणीतून समोर आला आहे. 

पाहणीतून महापालिकेचा निष्कर्ष 

शहरात आतापर्यंत वीस हजारांहून अधिक कोरोना संशयितांवर उपचार करण्यात आले. त्यात कोरोना व क्षयरोगाची लक्षणे सारखीच असल्याने अशा प्रकारच्या रुग्णांवर कोरोनाचे उपचार करण्यात आले. शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शासन व जागतिक आरोग्य संघटनेकडून प्राप्त झालल्या निर्देशानुसार लक्षणांची तपासणी करण्यात आली. जून व जुलैत कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेतर्फे तपासण्या वाढविण्यात आल्या. या तपासण्यांमध्ये सर्दी, खोकला, ताप आदी लक्षणे असलेल्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे समजून उपचार करण्यात आले. 

कोरोनाचा बदलता ट्रेन्ड ठरतोय डोकेदुखी

त्यानंतर तोंडाला चव न येणे, भूक न लागणे, वजन घटणे आदी प्रकारची कोरोनाची लक्षणे आढळू लागली. कोरोना संसर्गाचा बदलता ट्रेन्ड महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी डोकदुखी ठरू लागला. बदलत्या ट्रेन्डनुसार उपचार करत असताना आता कोरोना व क्षयरोगाची लक्षणे सारखीच असल्याने त्याअनुषंगाने कोरोना संशयितांची संख्या वाढत
आहे. 

कोरोना व क्षयरोगाचा आजार फुफ्फुसाशी संबंधित 

शहरात आतापर्यंत २० हजारांवर कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील सात हजार ४४९ रुग्णांवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले. यात एक महत्त्वाची बाब निदर्शनास आली. कोरोना व क्षयरोगाचा आजार फुफ्फुसाशी संबंधित आहेत. वजन घटणे, सातत्याने खोकला येणे, सर्दी, ताप, भूक न लागणे ही सारखी लक्षणे आहेत. वैद्यकीय पथकाला अशा प्रकारचे
रुग्ण आढळले. कोरोना संशयित म्हणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. परंतु उपचारावेळी छातीचा एक्स-रे काढण्यात आला, त्यावेळी क्षयरोग आढळला. त्यामुळे कोरोना संशयितांचा वाढलेला आकडा हा क्षयरोगाच्या लक्षणामुळे वाढल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

क्षयरोग व कोरोना संसर्गाची लक्षणे सारखीच असल्याने तपासणीवेळी अशा रुग्णांना संशयित म्हणून दाखल करून घेतले जाते. एक्स-रे काढल्यानंतर त्यातून कोरोना की क्षयरोग, हे स्पष्ट होते. - डॉ. कल्पना कुटे, आरोग्य अधिकारी, महापालिका  

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With the same symptoms as tuberculosis The number of Corona suspects increased nashik marath news