
अकराव्या वर्षी आपण किन्नर समाजात जन्माला आलेलो आहोत हे लक्षात आलेल्या राणी उर्फ संजना महाले नववी पर्यंतचे शिक्षण बिडी भालेकर हायस्कूल घेतले. मात्र घरच्यांनी राणीला दूर न करता आणि किन्नर समाजातील गुरुंकडे न पाठवता घरात एक व्यक्ती म्हणून सन्मानाची वागणूक दिल्याने राणीवर उत्तम संस्काराचा परी स्पर्श झाला
नाशिक : किन्नर म्हणजे केवळ पैसे मागणे हे काम नसून समाजात माणूस म्हणून जगता यावे या उद्देशाने किन्नर समाजातल्या काही व्यक्तींनी समाजासमोर आदर्श निर्माण केलेला आहे नाशिक रोडची संजना मनोहर महाले ही किन्नर समाजाची आयडल ठरत असून तिचा आदर्श किन्नर समाजाने घेतला पाहिजे.अकराव्या वर्षी आपण किन्नर समाजात जन्माला आलेलो आहोत हे लक्षात आलेल्या राणी उर्फ संजना महाले नववी पर्यंतचे शिक्षण बिडी भालेकर हायस्कूल घेतले. मात्र घरच्यांनी राणीला दूर न करता आणि किन्नर समाजातील गुरुंकडे न पाठवता घरात एक व्यक्ती म्हणून सन्मानाची वागणूक दिल्याने राणीवर उत्तम संस्काराचा परी स्पर्श झाला किन्नर केवळ पैसे मागत नाही तर स्वतः कष्ट करून पैसे कमावतात ही संकल्पना राणी आपल्या कार्यातून दाखवत आहे.
असाही संजनाचा प्रवास.........
गेल्या नऊ वर्षांपासून नाशिक रोडच्या उड्डाणपुलाखालील संजना(राणी) चहा नाश्ता व्यवसाय करून आपला चरितार्थ चालवत आहे. मेसाई चहा टपरी या नावाने राणीचा व्यवसाय सुरू असून घरातील आई, बहिण, भाऊ यांना ती सांभाळत आहे. किन्नर समाजाने केवळ पैसे मागण्यापेक्षा कष्ट करून चरितार्थ चालवला पाहिजे भारतीय समाजव्यवस्था खूप निर्मळ असून किन्नरांनी सदाचरण केल्यास लोक किन्नर व्यक्तींना स्वीकारतात अशी भावना राणीच्या मनात आहे. लहानपणापासून शिक्षणातून सामाजिक अभ्यास झालेल्या राणीने आपल्या जीवनात मूल्य आणि सद्गुणांना नेहमीच प्रेरणा दिलेली आहे. उड्डाणपुलाखालील गरीब भिकारी आणि पैसे नसलेल्या व्यक्तींना राणी स्वखर्चातून खाऊ-पिऊ घालते. सकाळी पाच वाजता राणी स्वतः दुकान उघडते नाशिक रोडच्या भाजीबाजारात राणीची कांदा भजी खूप फेमस झाली आहे. लोक आवडीने कांदा भजी खाण्यासाठी राणीच्या स्टॉलवर येतात मात्र लोक दुजाभाव कधीही करत नसल्याची आठवण राणीने सांगितली आहे. इथल्या लोकांनी मला स्वीकारले आहे म्हणून
मी समाजात ताठ मानेने जगत असून प्रत्येक किन्नर व्यक्तीने काम करून स्वतःचा चरितार्थ चालवला पाहिजे असे राणी म्हणते.
यासाठी राणी महिलांना मुलगी होण्याचा आशीर्वाद देते
किन्नर समाजाकडे आज समाजाचा दृष्टिकोन हा सकारात्मक होत चाललेला असून न्यायालयाने समलैंगिक संबंधांचा जो अधिकार किन्नर समाजाला दिला आहे त्यामुळे किन्नर समाजात सामाजिक स्थैर्य नक्कीच प्राप्त होईल किन्नर समाजाला समाजात सन्मानाचे स्थान मिळेल असे राणी सांगते. प्रत्येक कुटुंबात एक मुलगी असावी यासाठी राणी महिलांना मुलगी होण्याचा आशीर्वाद देते राणीला अनेक जण घरी पूजेसाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी बोलवतात. दातृत्व ठेवल्यास सगळी सुख आपल्या चरणी लोटांगण घालतात असे राणी सर्वांना सांगते म्हणूनच आपल्या जडणघडणीचे श्रेय राणी आई वडील शिक्षक यांच्या बरोबरच मुंबईचा पायल गुरू यांनाही देते .
हेही वाचा > धरणावर वनभोजन करताना दोन विद्यार्थी गायब...शोध घेतल्यास धक्काच!..
सामाजिक कार्यासाठी राणीला अनेक पुरस्कार
राणीला आजपर्यंत विविध संघटना सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर गौरवण्यात आलेले आहेत. आपल्या सामाजिक कार्यासाठी राणीला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत .समाजात किन्नर समाजाबद्दल महिला आणि पुरुषांमध्ये
भीती कमी व्हायला पाहिजे आणि किन्नर समाजाला एका कुटुंबाने एक व्यक्तीला दत्तक घेतल्यास समाजातली असमानतेची दरी नाहीशी होईल असे राणीला वाटते म्हणून राणी नाशिक रोडची आयडॉल बनली आहे.
हेही वाचा > नदीवरील पडक्या खोलीत तो 'तिच्यावर' बळजबरीने...सत्य समजल्यावर धक्काच!