VIDEO : "राज्यपाल हे घटनात्मक पदावर बसून घटनेचे मारेकरी" संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

Sanjay Raut says non appointment of Governor appointed MLAs is an insult to the people of Maharashtra
Sanjay Raut says non appointment of Governor appointed MLAs is an insult to the people of Maharashtra

नाशिक : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या दहा महिने उलटूनही आमदारांची नियुक्ती होत नाही. अभ्यास करायला एवढा वेळ लागतं नाही,  तुम्ही घटनात्मक पदावर बसून घटनेचे मारेकरी म्हणून काम करत आहात, हा विधिमंडळाचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे, अशा शब्दांत शिवेसेनेचे नेत संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्ला चढवला. 

संजय राऊत यांच्या उपस्थितीत वसंत गीते, सुनील बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्या त्याप्रसंगी राऊत म्हणाले की, राजकीय मतभेद राजकीय लढाई आम्ही लढू तुम्ही घटनेचा खून करु नका, भाजपचा घटनेशी थोडा जरी संबंध असेल तर त्यांनी पुढाकार घेवून आमदार नियुक्तीची घोषणा करण्यास राज्यपालांना सांगावे

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्र लढणार

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील एकत्रितपणे लढण्याचे शिवसेनेचे प्रयत्न आहे. परंतू तळागाळातील कार्यकर्त्यांना सामावून घ्यायचे असल्याने निवडणुका स्वतंत्र लढविल्या जातील अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली. 

काय म्हणाले राऊत

नाशिक दौयावर आलेले खासदार राऊत यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी महाराज करण्याच्या मुद्यावरून भाजपची भुमिका दुटप्पी आहे. औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलण्याचा ठराव राज्याचे कॅबिनेटने मंजूर करून केंद्राला पाठवला आहे. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने त्याचा पाठपुरावा भाजप कडून केला जात नाही. औरंगाबादचे संभाजी नगर नामांतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे हे भाजपने विसरु नये. बिहार राज्यातही औरंगाबाद जिल्हा आहे. त्या जिल्ह्याचे नामकरण करण्यास मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोध केल्यानंतर भाजपने या विषयावर भुमिका स्पष्ट करावी. काँग्रेसकडून नामांतराला विरोध होत असला तरी, संभाजी राजेंचे भक्त कॉंग्रेस मध्येही आहे. त्यामुळे ते देखील या विषयावर सकारात्मक आहेत. महाविकास आघाडीचा समान विकास कार्यक्रम राज्य चालविण्यासाठी आहे. परंतू त्याव्यतिरिक्त भावनांचाही विचार व्हायला पाहिजे. 


विरोधी पक्षाचा सन्मान 

भाजपकडून ईडीचा गैरवापर होत आहे. भाजपकडून विविध माध्यमातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांचे वार, हल्ल्याचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नसल्याचे शल्य भाजप नेत्यांमध्ये आहे. परंतू आम्ही तलवार उपसली तर अनेकांना पळती भुई थोडी होईल. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल. हे ईडी, सिबिआयचा तगादा लावणायांनी लक्षात ठेवावे असा ईशारा दिला. आम्ही विरोधी पक्षांचा सन्मान राखतो, गिरीष महाजन यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन वर्षांपुर्वीचा असल्याचे ते सांगतात. हाच न्याय आम्हाला नोटीसा पाठविताना का नाही? त्यावेळी भाजप वाल्यांची सुबुध्दी कुठे जाते असा सवाल खासदार राऊत यांनी केला. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com