PHOTOS : "सावित्रीजोती" सावित्रीबाईंच्या भूमिकेला मालेगावच्या लेकींची गवसणी

घनश्याम अहिरे : सकाळ वृत्तसेवा | Tuesday, 7 January 2020

मालिका सुरू झाली अन चित्रीकरण दरम्यान गप्पांच्या ओघात कलाकारांच्या मुळगावाचा विषय चर्चेत आला आणि मालेगावचा त्रिवेणी संगम झाल्याने कलाकारांना आनंदाचे भरते आले. मालिकेच्या निमित्ताने एक अनोखा योग जुळून आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला.​

नाशिक : मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मालेगावच्या तुऱ्यात आणिक एका मानाचे स्थान पटकावलं आहे. टीव्हीवर बहुप्रतिक्षित सावित्री ज्योती' या मालिकेत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावरील मालिकेत मालेगाव तालुक्यातील तीन कलाकार महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. सावित्रीबाईंच्या प्रवासातील दोन्हीही मुख्य भूमिका येथील लेकींच्या तर सहाय्यक दिग्दर्शनाची संधी तालुक्यातील लेकराला गवसली आहे.

Advertising
Advertising

प्रेक्षकांना होती उत्सुकता... 

छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,जिजामाता, रमाबाई रानडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर या ऐतिहासिक मालिकानंतर आता सामाजिक सुधारणेच्या इतिहासातील आद्य नाव ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील टीव्हीवर मालिकेची प्रेक्षकांना उत्सुकता होती. या दाम्पत्याची यशोगाथा दशमी प्रोडक्शन सोनी टीव्हीवर 'सावित्रीज्योती, आभाळा एवढी माणसं होती.! ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे. यातील ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांची मुख्य भूमिका कोण साकारणार याविषयी प्रेक्षकांना उत्सुकता होती. 

मालेगावचे तारे मालिकेमध्ये
सोयगाव योगायोग मंगल कार्यालय जवळ राहणारे येथील सेवानिवृत्त पशुवैद्य वसंतराव शिंदे यांची नात आणि प्रा.हेमंत व भारती शिंदे या शिक्षक दांपत्याची नववीत शिकणारी कन्या तृशनिका ही लहानग्या 'साऊ'ची भूमिका साकारत आहे. यापूर्वी 'हृदयांतर चित्रपटातील मुख्य भूमिका प्रेक्षकांना भावली होती. सोयगावच्या मातीतलं हे अस्सल नाणं आता सावित्रीबाईच्या भूमिकेत झळकत आहे. मोठेपणीच्या सावित्रीबाईंनी भूमिकेसाठी मालेगाव येथील म्युनिसिपल हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक, मालेगाव कॅम्प स्थित एम.एम कासार यांची नात व मुंबईत वास्तव्य करणारे डॉ.उल्हास कासार यांची कन्या अभिनेत्री अश्विनी कासार हिची निवड झाली आहे. कमला, कट्टी-बट्टी या मालिकेत घराघरात पोहचलेली ही अभिनेत्री आता सावित्रीबाई यांची ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे. या दुहेरी योगायोगसह तिसरा संगमयोग दाभाडीच्या  कलाकाराने साधला आहे. अहिराणी कवी डॉ.एस.के.पाटील यांचे चिरंजीव अक्षय पाटील या मालिकेला क्रिएटिव्ह दिग्दर्शन करीत आहेत. मराठी चित्रपट व मालिकांचा दीर्घ अनुभव त्याच्या गाठीशी आहे.या तिन्हीही कलाकारांनी मालेगाव चे नातं अधोरेखित झाल्याबद्दल 'सकाळशी बोलतांना आनंद व्यक्त केला आहे.

हेही वाचा > दहा वर्षाच्या मुलांचा धक्कादायक प्रकार...पोलिसांसह पालकही चक्रावले..​

मालिकेच्या निमित्ताने एक अनोखा योग
मालिका सुरू झाली अन चित्रीकरण दरम्यान गप्पांच्या ओघात कलाकारांच्या मुळगावाचा विषय चर्चेत आला आणि मालेगावचा त्रिवेणी संगम झाल्याने कलाकारांना आनंदाचे भरते आले. मालिकेच्या निमित्ताने एक अनोखा योग जुळून आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सावित्रीबाई फुलेंची लहानपणीची आणि मोठेपणीची भूमिका साकारणान्या त्या दोन्ही कलाकार आणि मालिकेचा क्रिएटिव्ह दिग्दर्शक असे हे तीनही कलाकार मूळ मालेगाव तालुक्यातील रहिवासी असल्याने महत्वपूर्ण मालिकेच्या निमित्ताने चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा > भयावह! बाईकवरून सुसाट जाताना..अचानक बाजूच्या धावत्या कारचा दरवाजा उघडला...