शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर! सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंतचे शैक्षणिक कॅलेंडर जाहीर 

विजय पगार
Tuesday, 22 September 2020

दर वर्षी फेब्रुवारीत होणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा यंदा दोन महिने लांबणीवर टाकण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षात ही परीक्षा एप्रिलच्या अंतिम आठवड्यात घेण्याचे निश्‍चित झाले असून, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत नुकताच निर्णय जारी केला.

नाशिक / इगतपुरी : दर वर्षी फेब्रुवारीत होणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा यंदा दोन महिने लांबणीवर टाकण्यात आली आहे. चालू शैक्षणिक वर्षात ही परीक्षा एप्रिलच्या अंतिम आठवड्यात घेण्याचे निश्‍चित झाले असून, राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबत नुकताच निर्णय जारी केला.

शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिष्यवृत्तीची परीक्षा वेळेत घेणे शक्‍य होणार नाही. या परीक्षेबाबत दर वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अधिसूचना जाहीर होते. दरम्यान, ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ उपक्रमांतर्गत नोव्हेंबरपर्यंतचे शैक्षणिक कॅलेंडर उपलब्ध झाले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (विद्या प्राधिकरण) पहिली ते दहावीचे विद्यार्थी व शिक्षकांसाठी सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांची शैक्षणिक दिनदर्शिका (कॅलेंडर) उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा >  मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंतचे शैक्षणिक कॅलेंडर जाहीर 

आरोग्य व दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्‍न असणाऱ्या असंख्य बालकांना परिस्थितीमुळे शिक्षण सोडण्याची वेळ येऊ नये व शिक्षणाशी, शिक्षकांशी त्यांचा संबंध तुटू नये यासाठी ‘शाळा बंद; पण शिक्षण सुरू’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांचे व आता सप्टेंबर ते नोव्हेंबर अशा तीन महिन्यांचे शैक्षणिक कॅलेंडर जाहीर करण्यात आले आहे.  

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

संपादन - ज्योती देवरे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Scholarship examination extended nashik marathi news