सध्या नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग दिवसाआड सुरू आहेत. त्याच धर्तीवर पाचवी ते आठवीचे गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांसाठी दिवसाआड व दोन तासांचे वर्ग भरणार आहेत. शाळांमध्ये पालकांची संमती बंधनकारक आहे. सॅनिटाझर, मास्क शाळांमध्ये बंधनकारक राहणार आहे. एका विद्यार्थ्याला आठवड्यातून तीनदा वर्गांना हजर राहावे लागेल.
नाशिक : कोरोना परिस्थितीत सुधारणा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार (ता. २७)पासून शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. शहरात एक लाख दहा हजार ७७३ विद्यार्थी व दोन हजार ६०२ शिक्षकांनी गजबजणाऱ्या शाळांमध्ये कोरोनासंदर्भात नियम घालून दिले असून, शाळेत प्रवेश करण्यापूर्वी दोन हजार २४९ शिक्षक, लिपिक व शिपाईपैकी बाराशे जणांची कोरोना चाचणी झाली आहे.
लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून शाळांची दारे खुली
सध्या नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग दिवसाआड सुरू आहेत. त्याच धर्तीवर पाचवी ते आठवीचे गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांसाठी दिवसाआड व दोन तासांचे वर्ग भरणार आहेत. शाळांमध्ये पालकांची संमती बंधनकारक आहे. सॅनिटाझर, मास्क शाळांमध्ये बंधनकारक राहणार आहे. एका विद्यार्थ्याला आठवड्यातून तीनदा वर्गांना हजर राहावे लागेल.
#Nashik : पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा (ता.२७)बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. पेठे हायस्कूल येथे शाळेत आलेल्या मुलांचे पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांनी स्वागत केले. #schools #pandemic (video -केशव मते) pic.twitter.com/WIA3KmOLAN
— Sakal Nashik (@SakalNashik) January 27, 2021
हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या
कोरोना अहवाल सादर करण्याच्या सूचना
कोरोना चाचणीसाठी महापालिकेच्या शाळांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षक मिळून २०६, तर खासगी शाळांमध्ये दोन हजार २४९ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी दिली. एकूण एक हजार २०० शिक्षक, लिपिक यांची कोरोना तपासणी झाली आहे. उर्वरित शिक्षक, लिपिकांना २९ जानेवारीपर्यंत कोरोना अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महापालिकेच्या शाळा- १०२
खासगी शाळा- ३०३
एकूण शाळा- ४०५
पाचवी ते आठवीचे विद्यार्थी
महापालिका शाळा- १५ हजार ४७६
खासगी शाळांचे विद्यार्थी- ९५ हजार २९७
एकूण- एक लाख दहा हजार ७७३
शिक्षकांची संख्या
महापालिका- ४७५
खासगी शाळा- दोन हजार १२७
एकूण- दोन हजार ६०२